-
पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहरात आज शिवसेनेने आंदोलन केलं.
-
यावेळी शिवेसनेने मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच मोदी सरकारविरोधात 'चले जाव'ची बॅनर्सही आंदोलकांच्या हाती होती.
-
शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख संजय मोरे यांंनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं.
-
पेट्रोलचे दर मागील १० वर्षांमध्ये कसे वाढत गेले हे दाखवणारे फलकही आंदोलकांच्या हाती होते.
-
मोदी-शहाचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या.
-
गॅसचे वाढलेले दर कमी करावेत अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
-
सततच्या इंधन दरवाढीमुळे भविष्यात रुग्णवाहिका कशी असेल यासंदर्भातील दृष्यही शिवसेनेने या आंदोलनात साकार केलं होतं.
-
एका बैलगाडीवर डॉक्टर आणि रुग्ण उभे असून डॉक्टर रुग्णाला तपासत असल्याचे दाखवण्यात आलेलं.
-
पेट्रोल आणि डिझेलचे भाव असेच वाढत राहिले तर भविष्यात असे दिवस पहावे लागतील असं या देखाव्यामधून आंदोलकांना सांगायचं होतं.
-
बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
-
इंधनदरवाढीची झळा स्वयंपाक घरापर्यंत आली असून दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

पाय बघून कळेल लिव्हर खराब आहे की चांगलं! ‘ही’ ६ लक्षणे असतील तर दुर्लक्ष करू नका, नाहीतर…