-
मेष : संधीचा फायदा होईल_चांगल्या कामासाठी वाट पाहायला लावणारी वेळ आता आली आहे. दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी गुरू कुंभ राशीत रात्री २४ : २५ ला प्रवेश करीत आहे. तो तुमच्या राशीत लाभस्थानात येत आहे. संधीचा फायदा होईल. उशिरा का होईना फळ मिळाल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. व्यवसायात परिश्रम वाढले तरी फायद्याचे स्वरूपही वाढलेले असेल. स्वतंत्र्य व्यवसायाला प्रेरणा मिळेल. नोकरदारांना ही दिलासा देणाऱ्या गोष्टी घडतील. नवीन नोकरीचे प्रस्ताव स्वीकारणे योग्य राहील. आर्थिकदृष्टय़ा स्थिरस्थावर स्थिती निर्माण होईल. सामाजिक सेवेत स्वतला गुंतवून कामाचा आनंद घ्याल. एकूणच सप्ताहात भाग्योदय होईल. नातेवाईकांसोबत धार्मिक गोष्टींचे आयोजन कराल. मानसिकदृष्टय़ा समाधान लाभेल. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्तीकडे लक्ष द्याल. शुभ दिनांक : ४, ८ महिलांसाठी : आवडीच्या क्षेत्रात कार्य कराल. (स्मिता अतुल गायकवाड)
-
वृषभ : कमतरता भरून निघेल_५ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करणारा गुरू दशमस्थानात येत असून तुमच्या राशीस दहावा असेल. कर्म स्थानातून होणारे गुरूचे भ्रमण प्रामाणिक कष्टाला दाद देणारे ठरेल. चंद्र ग्रहाचेही पाठबळ उत्तम राहील. मागील काही दिवसांपासून रखडलेल्या कामाला गती मिळेल. व्यवसायात अपेक्षित फल प्राप्तीत वाढ होईल. वैद्यकीय क्षेत्रातील हालचाली वेगाने सुरू होतील. उद्योगधंद्यांना चालना मिळण्यास मदत मिळेल. नवीन कार्यप्रणाली अस्तित्वात येईल. नोकरदार वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. अधिकार प्राप्तीत वाढ झाल्याने कामातील उत्साह वाढेल. पशांच्या बाबतीतील कमतरता भरून निघेल. राजकीय क्षेत्रात थोरामोठय़ांचा वरदहस्त कायम राहील. मित्रांमार्फत लाभ मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदीदायक असेल. जेवण, झोप वेळेत घ्या,आरोग्य सांभाळा. शुभ दिनांक : ५, ६ महिलांसाठी : तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळणारे असेल.
-
मिथुन : शुभ संकेत मिळतील_बऱ्याच कालावधीनंतर येणारे ग्रहमान अनुकूलता वाढवणारे असेल. ५ एप्रिल २०२१ रोजी गुरू कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरू ग्रहाचे व चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून होणारे असेल. भाग्यकारक गुरू उणीव भरून काढेल. अनेक चांगल्या गोष्टींना प्राधान्य वाढेल. कला कौशल्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव सफल होईल. नोकरदार वर्गाचे बोलण्याचे चातुर्य इतरांना अचंबित करणारे असेल. नवनवीन घडामोडींचा तर्क करणे आवडेल. बौद्धिक क्षेत्रात आकलनशक्ती उत्तम राहील. आर्थिक स्तरावर बचत करणे योग्य ठरेल. सामाजिक माध्यमाच्या ठिकाणी माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल जाहिरात करणे टाळा. तरुण वर्गाला वैवाहिकदृष्टय़ा शुभसंकेत मिळतील. शारीरिक दृष्टय़ा शरीर प्रकृती तंदुरुस्त राहील. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : धार्मिक गोष्टींची आवड वाढेल.
-
कर्क : संयम ठेवा_५ एप्रिल रोजी गुरू कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. तो तुमच्या अष्टमस्थानात येत आहे. कोणत्याही गोष्टीची घाई करणे परवडणारी नसेल. चंद्र षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे भ्रमण करीत आहे. संभाषण चातुर्य उत्तम असले तरी शब्द जपून वापरा. व्यवसायात नको ते धाडस करणे टाळा. व्यावसायिकदृष्टय़ा हतबल न होता तयारी वाढवा. योग्य मुद्दे ठरवून मांडणी करावी लागेल. आवाक्याबाहेरच्या गोष्टींना थारा देऊ नका. नोकर वर्गाने वरिष्ठांशी हुज्जत घालणे योग्य ठरणार नाही. जबाबदारीच्या गोष्टी इतरांवर सोपवू नका. पशाच्या बाबतीत उधार उसनवारी व्यवहार टाळा. राजकीय क्षेत्रात वास्तवतेला महत्त्व द्या. कुटुंबातील व्यक्तीशी संवाद साधताना मनावर संयम ठेवा. जुन्या व्याधींकडे वेळीच लक्ष द्या. शुभ दिनांक : ५, १० महिलांसाठी : कुटुंबाचा तिरस्कार करणे टाळा.
-
सिंह : वेळेचे नियोजन करा_कुंभ राशीतील गुरू ग्रहाचे भ्रमण सप्तम स्थानातून दिनांक ५ एप्रिल रोजी होत आहे. दुराव्याचे सावट कमी होऊन नवीन नात्यात वाढ होईल. अंगी असलेला चिवटपणा स्थिर राहण्यास मदत करेल. संघर्षदायक काळ कमी झाल्याने नवीन योजनांना प्रोत्साहन मिळेल. मात्र सप्ताहात चंद्र भ्रमणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा व्यावहारिक गोष्टींना महत्त्व द्या. भावनिक निर्णय टाळा. भागीदारी व्यवसायात चढ-उतार राहील. नोकरदार वर्गानी हिशोबाच्या नोंदी ठेवणे इष्ट राहील. ताणतणाव वाढवून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही हे प्रथम लक्षात घ्या. कामाच्या बाबतीत वेळेचे नियोजन केल्यास अडचण भासणार नाही. आर्थिक बाबतीत आवक जेमतेम राहील. नातेवाईकांशी असलेला दुरावा कमी करा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत न पडणे केव्हाही चांगले. प्रकृती स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी पथ्यपाणी सांभाळा. शुभ दिनांक : ४, ५ महिलांसाठी : आगामी काळासाठीचा विचार सध्या न करणे इष्ट ठरेल.
-
कन्या : ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या_५ एप्रिल २०२१ रोजी गुरू कुंभ राशीत तुमच्या षष्टस्थानात प्रवेश करेल. गोंधळाची स्थिती निर्माण होऊ देऊ नका. गोड बोलून ध्येय साध्य करा. काही वेळा कमी बोलणे केव्हाही चांगले ठरणारे असेल. व्यवसायात होत असलेली फरफट कमी होईल. नवीन काही बदल केल्याने उत्पादनात वाढ होईल. ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यासाठी केलेल्या योजना यशस्वी ठरतील. नोकरदार वर्गाने अधिकारप्राप्तीसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा. पशांच्या बाबतीत वायदा देणे टाळा. सामाजिक स्तरावर गरसमजाचे वादळ कमी करा. जोडीदार तुमच्या मताशी सहमत असेल, याचा तुम्हाला अभिमान वाटेल. मुलांना वेळीच समज द्या. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या. शुभ दिनांक : ६, १० महिलांसाठी : स्वत:वरचे नियंत्रण सोडू नका.
-
तूळ : प्रसन्नता लाभेल_५ एप्रिल रोजी गुरू कुंभ राशीत प्रवेश करत असून, तो तुमच्या पंचमस्थानात येत आहे. हा कुंभ राशीतील गुरूइच्छा फलप्राप्ती वाढवणारा असेल. संततीचे स्वप्न पूर्ण होईल. नवीन ज्ञानात भर पडेल. व्यापार-उद्योगधंद्यात सरळमार्गी वाटचाल असेल. व्यवसाय वाढीसाठी पर्यायी व्यवस्था मार्ग निघेल. तो फायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. नव्या मिळणाऱ्या संधीतून समतोलपणा राखता येईल. नोकरदारांना मोठे योगदान मिळेल. मात्र जबाबदारी वाढल्याने वेळेत कामे पूर्ण करावी लागतील. नवीन नियमांचे पालन करावे लागेल. अर्थ संकल्पनांना कलाटणी मिळेल. राजकीय क्षेत्रात पदार्पण कराल. मुलांच्यासाठी केलेले नियोजन सत्कारणी लागेल. नात्यातील दुरावा कमी होईल. मानसिकदृष्टय़ा प्रसन्नता लाभेल. उपासनेत मन रमेल. प्रकृतीचे स्वास्थ्य उत्तम राहील. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : संघर्षदायक गोष्टींना पूर्णविराम मिळेल.
-
वृश्चिक : बढती मिळेल_कुंभ राशीत प्रवेश करणारा गुरू ५ एप्रिल रोजी तुमच्या चतुर्थस्थानात येत आहे. हा गुरू सुखात वाढ करणारा ठरेल. अडलेले प्रश्न मार्गी लागतील. उशिरा होणाऱ्या गोष्टी लवकर होऊ लागतील. व्यावसायिक कल्पना प्रत्यक्षात उतरतील. छोटय़ा-मोठय़ा व्यवसायातील चढउतार कमी झाल्याने व्यावसायिक धाडस वाढेल. व्यापारी क्षेत्र मोठय़ा चकमकीचे राहील. नोकरदारवर्गाला बढती मिळेल. वेतनवाढीचे संकेत मिळतील. नोकरीतील वर्चस्व चांगले राहिल्याने सुस्थिती निर्माण होईल. वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिक प्रश्न सुटल्याने मनाला उभारी मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या शब्दाचे वजन वाढेल. जनसंपर्क वाढल्याने धावपळ होईल. मुलांच्या बाबतीत निर्णय लवकर घेणे योग्य ठरेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रकृतीला आराम मिळेल. शुभ दिनांक : ४, ६ महिलांसाठी : मिळालेला मार्ग योग्य वळणावरचा असेल.
-
धनू : बौद्धिक क्षमता उत्तम_५ एप्रिल रोजी गुरू तृतीय स्थानात कुंभ राशीत प्रवेश करेल. पराक्रमी वृत्ती वाढेल. जीवनात वरचेवर संधी मिळेल. शास्त्रीय संशोधनासाठी उत्तम कालावधी असेल. खोलपणे विचार करण्याची वृत्ती राहील. संवादकौशल्य व बौद्धिक क्षमता उत्तम राहील. व्यापारी क्षेत्रात मोजक्याच गोष्टींमध्ये भांडवल गुंतवा. व्यावसायिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. इतरांमार्फत होणारा व्यवहार जपून करा. नोकरदार व्यक्तीने संयम सोडून चालणार नाही. मागील कामातील कसर भरून काढावी लागेल. हिशोबाची नोंद ठेवल्यास आर्थिक फसगत होणार नाही. सामाजिक क्षेत्रातील दबदबा चांगला राहील. भावंडांची साथ नात्यातील स्नेह वाढवणारी असेल. धार्मिक गोष्टींना प्राधान्य द्याल. शारीरिक, मानसिक समाधान लाभेल. शुभ दिनांक : ४, ५ महिलांसाठी : मनाची आत्मिक शक्ती वाढेल.
-
मकर : परिवर्तन घडेल_गुरू द्वितीय स्थानात ५ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरू तुमच्या राशीस दुसरा असेल. शत्रुत्व कमी होऊन धनदायक गोष्टीत वाढ होईल. बोलण्यातील वर्चस्व उत्तम असेल. त्यामुळे अनेक कामे प्रगतिपथावर राहतील. व्यावसायिक क्षेत्रातसुद्धा आरामात संधी प्राप्त होईल. त्याच्यासाठी घाई करण्याची गरज लागणार नाही. वेळेनुसार नियोजन केल्यास व्यावसायिक फायदा चांगला राहील. नोकरदार व्यक्तींनी संभाव्य गोष्टी लक्षात घ्या. स्पर्धात्मक गोष्टींच्या मागे लागू नका. विरोधकांवर मात कराल. खर्चीक गोष्टींना आवर घातल्यास बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या. मनस्ताप होणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. घरगुती वातावरणात परिवर्तन घडेल. जुन्या व्याधींपासून सुटका होईल. आरोग्य उत्तम असेल. शुभ दिनांक : ८, ९ महिलांसाठी : मोजक्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.
-
कुंभ : प्रतिष्ठा वाढेल_तुमच्याच राशीत ५ एप्रिल रोजी गुरूप्रवेश करत आहे. तो तुमच्या प्रथम स्थानात येत आहे. काळजीचे सावट कमी होऊन सुस्थितीत परिणाम झालेले जाणवू लागतील. लाभस्थानातील चंद्राचे भ्रमण अनपेक्षित लाभ देणारे ठरेल. सारखाच होणारा मानसिक व धावपळीचा कालावधी कमी होईल. व्यावसायिक कमतरता भरून निघेल. व्यवसाय पुढे नेणाऱ्या गोष्टींना प्राधान्य मिळत राहील. व्यवसायात मानसिकदृष्टय़ा हुरूप वाढेल. मोठे ध्येय नसले, तरी गुंतवणूक वाढेल. नोकरदारांचे इच्छित ध्येय साध्य होईल. पतप्रतिष्ठा वाढेल. शंका-कुशंकांचे वादळ जणू संपणारे असेल. अनावश्यक खर्च टाळला तर आर्थिकबाबतीत वाढ होईल. जुन्या मत्रीशी संपर्क साधून आठवणी जाग्या कराल. त्याचे स्मित तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. शारीरिकदृष्टय़ा सदृढ राहाल. शुभ दिनांक : ४, ६ महिलांसाठी : नियम सोडून वागणे टाळा.
-
मीन : कामगिरी उंचावेल_गुरूचा कुंभ राशीत ५ एप्रिल रोजीचा प्रवेश हा तुमच्या व्ययस्थानात असेल. मानसिक संतुलन बिघडू न देता स्थिर व्हा. जामीनदार, कर्जबाजारीपणा यांपासून दूर राहा. ग्रहमान अनुकूल नसले तरी अवघडही नाही. व्यावसायिकदृष्टय़ा मोठे धाडस सध्या करू नका. गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारून उधारउसनवारी करून उद्योग-व्यवसायात वाढ करणे इष्ट ठरणार नाही. गरजेपुरताच विचार करा. नोकरदारवर्गाची या सप्ताहातील कामगिरी उंचावेल. ज्येष्ठ व्यक्तींकडून पठबा मिळेल. खर्चाचा जम बसवल्यास आर्थिक कोंडी सुटेल. राजकीय क्षेत्रात आपली बाजू वरचढ ठरेल. व्यसनी व धूर्त मत्रीपासून लांब राहणे योग्य राहील. नातेवाईकांशी महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करणे टाळा. आहार व शारीरिक व्यायाम या दोन्ही गोष्टींना महत्त्व देणे हिताचे असेल. शुभ दिनांक : ६, ७ महिलांसाठी : वादग्रस्त प्रकरणांपासून लांब राहा.

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “मला माझ्या मुलाला…”