-
नव्या कारकीर्दीला सुरुवात_हिंदू नववर्षांची सुरुवात मोठय़ा उत्साहाने साजरी कराल. तुमच्याच राशीमध्ये चंद्र असताना गुढीपाडव्याचे प्रस्थान होत आहे. जुन्या संकटांची मालिका कमी होणार आहे. हे नववर्ष शुभदायक जाईल. १३ एप्रिल रोजी रवी मेष या उच्च राशीमध्ये प्रवेश करत आहे. मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. आजपर्यंत असलेले बेरीज वजाबाकी याचे गणित बाजूला ठेवून, नव्या कारकीर्दीला सुरुवात कराल. नोकरदारांना बदलीसाठी आता प्रयत्न करावे लागणार नाहीत. व्यवसायात होत असलेली परवड कमी झाल्याने व्यक्तिगत हालचाली सुरू होतील. खर्चाची बाजू सांभाळल्यास पशाचा प्रश्न जाणवणार नाही. राजकीय क्षेत्रातील कार्य सिद्धीस जाईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. उपासना फलद्रूप होईल. दीर्घकाळ आजाराची तीव्रता संपण्याच्या मार्गी असेल. शुभ दिनांक : १३, १४ महिलांसाठी : स्वकर्तबगारीवर यश मिळवाल (स्मिता अतुल गायकवाड)
-
मनोदय पूर्ण होईल_खर्चाला लगाम घातल्यास पाडवा सुवर्णदायी ठरेल. नववर्षांची सुरुवात कोणतीही अढी मनामध्ये न ठेवता केल्यास एक प्रकारची गोडी निर्माण होईल. १३ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करणारा रवी तुमच्या व्ययस्थानात असेल. कायदा क्षेत्रातील नियमांचे पालन करा. मिथुन राशीत प्रवेश करणारा मंगळ द्वितीय स्थानात येत आहे. नोकरदारांना संधीतून सोने करता येईल. अस्वस्थ वाटणारी नोकरी स्थिर होऊ लागेल. व्यवसायात मोठी भरारी माराल. उद्योगधंद्यांना चालना मिळेल. आर्थिकदृष्टय़ा नियोजन करा. सामाजिक स्तरावर जनमानसात लोकप्रियता मिळेल. नवीन वास्तूचे स्वप्न प्रत्यक्ष उपभोगाल. तुमचे मनोदय पूर्ण होईल. घरातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल. मुलांसाठी खरेदीचे बेत आखाल. दगदग कमी केल्यास, प्रकृतिस्वास्थ्य उत्तम लाभेल. शुभ दिनांक : १५, १६ महिलांसाठी : बोलण्यातील स्पष्टपणा कमी केलेला केव्हाही चांगला.
-
संवेदनशीलता वाढेल_दिनांक १३ एप्रिल रोजी चत्र पाडव्याची सुरुवात तुमच्या लाभस्थानातून होत आहे. चंद्राचे भ्रमणही लाभस्थानात होईल. जुळून आलेल्या ग्रहांचा प्रभाव सकारात्मक असेल. नव्या योजना फलद्रूप होतील. रवी मेष राशीत, मंगळ मिथुन राशीत १३ एप्रिल रोजी प्रवेश करत आहे. तर मंगळ तुमच्याच राशीत असेल. सूर्याच्या तेजाप्रमाणे मनाची ताकद वाढणार आहे. नोकरदारांना असलेला सतत कामाचा ताण कमी करण्यासाठी ज्येष्ठांची मदत मिळेल. नोकरीतील सुस्थिती बदलू लागेल. व्यापारी क्षेत्रात बऱ्यापैकी हस्तक्षेप चांगला राहील. कामाचे सर्व नियंत्रण अचूक साधण्यात यश येईल. व्यवसाय टप्प्याटप्प्याने वाढत राहील. मिळालेल्या उत्पन्नाचे गुंतवणुकीत रूपांतर करा. राजकीय क्षेत्रातील संवेदनशीलता वाढेल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल. शुभ दिनांक : १३, १४ महिलांसाठी : नियम सोडून वागू नका.
-
अपेक्षित लाभ मिळेल_नव्या यशाची नव्या उत्साहाची गुढी उभा करून, नववर्षांचा उत्साह साजरा कराल. आगामी काळासाठीचा संकल्प प्रगतीच्या पाऊलवाटेवर असेल. चंद्रग्रहणाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. मेष या उच्च राशीत असलेला रवी दशमस्थानात येत आहे. थोरामोठय़ांचे कृपाछत्र कायम राहील. मिथुन राशीतील मंगळ १३ एप्रिल रोजी व्ययस्थानात प्रवेश करेल. शासकीय कर्मचाऱ्यांचा ताण वाढला, तरी तो योग्य कारणासाठी असेल. चांगल्या कामाचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही. वैद्यकीय क्षेत्रात परिस्थितीवर मात करून पुढील पाऊल उचलणे चांगले राहील. तुमचे कौशल्य यश मिळवून देणारे ठरेल. आर्थिकदृष्टय़ा अपेक्षित लाभ मिळेल. सामाजिक क्षेत्रातील बांधिलकी वाढेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. प्रकृतिस्वास्थ्य ठणठणीत राहील. शुभ दिनांक : १५, १६ महिलांसाठी : जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल.
-
आनंदी वार्ता कळेल_भाग्यस्थानातून होणारे नववर्षांचे प्रस्थान मनोकामना पूर्ण करणारे असेल. या चत्र पाडव्यानिमित्त नव्या खरेदीचा उत्साह पार पाडाल. चंद्र रवी शुक्र या ग्रहांचे भ्रमण भाग्यस्थानात होत आहे. मनात असणारे ध्येय निश्चितच फायदा मिळवून देणारे असेल. रवी मेष या उच्च राशीत असून, मंगळ लाभस्थानात मिथुन राशीत असेल. नोकरदारांचे कामातील निर्भय धाडस वाढेल. वरिष्ठांचा विश्वास अलौकिक समाधान मिळवून देईल. व्यापारी क्षेत्रात आकर्षक योजना तुमच्या हाती पडण्याचे संकेत दिसू लागतील. अनेक नवे परिचय होतील. ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम राहील. अनावश्यक गोष्टींना आळा घालून बचतीत वाढ करा. राजकीय क्षेत्रात विरोधकांचा त्रास मावळेल. व्यसनी व धूर्त मित्रांपासून लांब राहा. भावंडांशी झालेल्या संवादातून आनंदवार्ता कळेल. सकस आहार व योग्य संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक : १३, १७ महिलांसाठी : भावनेला आवर घाला.
-
अडचणींवर मात करा_चैत्र पाडव्याची सुरुवात कोणताही क्लेश मनी न धरता करा. प्रयत्नवादी राहा. भावनिक गोष्टीत न रमता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. १३ एप्रिल रोजी रवी अष्टमस्थानात मेष राशीत प्रवेश करेल. मंगळ दशमास्थानी मिथुन राशीत असेल. नोकरवर्गाला वेळापत्रकाप्रमाणे कामाचा श्रीगणेशा करावा लागेल. सुधारित गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. कमी श्रमात जास्ती उत्पादन मिळवण्याचे तंत्र सध्या लांबणीवर टाका. व्यवसायात रखडलेल्या योजना मार्गी लावा. कागदोपत्री व्यवहार नीट सांभाळा. आर्थिकदृष्टय़ा आवक चांगली राहील. परंतु आवक पाहून जावक ठरवा. राजकीय क्षेत्रात चढ-उतार राहील. कौटुंबिकदृष्टय़ा येणाऱ्या अडचणींवर मात करा. आध्यात्मिक गोष्टीतील सहभाग मानसिक अस्वस्थता कमी करेल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. शुभ दिनांक : १६, १७ महिलांसाठी : आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहा.
-
मानसिकता जपा_गुढी उभारण्याचा आनंद जसा उत्साहात साजरा करता, तशीच नववर्षांची सुरुवात ही प्रगतीच्या वाटचालीकडे करा. १३ एप्रिल रोजी रवी मेष या उच्च राशीत तुमच्या सप्तमस्थानात येत आहे. मंगळ मिथुन राशीत भाग्यस्थानात प्रवेश करेल. चंद्र षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे भ्रमण करीत असताना मानसिकता जपा. नोकरदार वर्गाने इतरांवर अवलंबून न राहता स्वत: कार्यतत्पर राहणे योग्य राहील. व्यावहारिक गोष्टींच्या नोंदी तपासून पाहा. व्यावसायिकदृष्टय़ा होणारा संघर्ष कमी करा. उत्पादनाच्या जेमतेम गोष्टीच वाढवा. गरजेपुरता विचार करा. विनाकारण धावपळ वाढवणे टाळा. आर्थिक चणचण भासली तरी मार्ग काढून पुढे जा. राजकीय क्षेत्रात संवादातून गरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना जपा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ दिनांक : १३, १४ महिलांसाठी : तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
-
दुहेरी भूमिका टाळा_चैत्र गुढीपाडव्याचे आगमन शुभदायक करा. रवी मेष या उच्च राशीत षष्ठस्थानात प्रवेश करत असून मंगळ अष्टमात मिथुन राशीत प्रवेश करेल. समयसूचकतेने नियोजन केल्यास अस्वस्थता वाढणार नाही. सरकारी कर्मचारी वर्गाने कामाचा जुना अनुभव विसरून चालणार नाही. नियमावली लक्षात घेऊनच क्रम ठरवा. व्यवसाय करताना आजचे काम उद्यावर ढकलू नका. आजचे काम आजच पूर्ण करणे हिताचे राहील. नवीन व्यावसायिक वाढीसाठी दुहेरी भूमिका टाळा. व्यवसायात होणारा अटीतटीचा गोंधळ थांबेल. व्यावहारिकदृष्टय़ा उत्पादनातील मोठे व्यवहार रोखीच्या स्वरूपात करा. पशाचे व्यवहार इतरांच्या जबाबदारीवर करू नका. सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकताना सखोलपणे विचार करा. संततीची गोड बातमी कळेल. मानसिक व शारीरिक संतुलन बिघडू देऊ नका. शुभ दिनांक : १५, १६ महिलांसाठी : जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा.
-
योग्य मार्ग निघेल_नववर्षांचे स्वागत आनंदाने साजरे कराल. खरेदीचे बेत आखाल. पंचम स्थानात येणारा मेष या उच्च राशीत रवी प्रवेश करीत आहे. सप्तमस्थानात मंगळ मिथुन या राशीत १३ एप्रिल रोजी प्रवेश करेल. नोकरदार वर्गाने कामाची तासिका ठरवून ठेवा. धरसोड वृत्ती कमी करा. कामाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देऊ नका. व्यापारी उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असलेले व्यवहार करा. बदलत्या घडामोडींतून योग्य मार्ग निघेल. अंदाज घेऊन कार्यरत राहा. आर्थिकदृष्टय़ा होणारी गरसोय कमी होईल. मात्र खर्चाचा ताळमेळ लागणार नाही. यासाठी विशेष उपाययोजना करणे हिताचे राहील. राजकीय क्षेत्रात तुमचे मत ग्राह्य़ धरण्यासाठी अट्टहास करू नका. मुलांचे सहकार्य उत्तम राहील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण असेल. शुभ दिनांक : १३, १४ महिलांसाठी : स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिका.
-
ऊर्जा दीर्घकाळ टिकेल_या नूतन वर्षांची सुरुवात एकत्रितरीत्या साजरी करण्याचा आनंद उपभोगाल. १३ एप्रिल रोजी राशी बदल करणारा रवी चतुर्थ स्थानात, तर मंगळ मिथुन राशीत षष्ठस्थानात प्रवेश करेल. ग्रहांची अनुकूलता संमिश्र फळ देणारी असेल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यपद्धती सुरळीत चालू राहील. व्यवसायात आतापर्यंतची स्थिती ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था कमी होईल. त्यामुळे मनावर दडपण राहणार नाही. बचतीत वाढ झाल्याने उत्पादन वाढवता येईल. सार्वजनिक ठिकाणी केलेले नियोजन पूर्णत्वाला जाईल. याचे समाधान राहील. तुमचे विचार इतरांना पटतील. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी कुटुंबाला विचारात घ्या. मानसिक एकाग्रता वाढवा. उपासनेत मन रमवा. शारीरिकदृष्टय़ा ऊर्जा दीर्घकाळ टिकेल. शुभ दिनांक : १३, १६ महिलांसाठी : आदरयुक्त जीवनशैली राहील.
-
आर्थिक मजबुती येईल_चैत्र पाडव्यानिमित्त अनेक योजना राबविण्याचा संकल्प कराल. नव्या वाटचालीकडे प्रस्थान राहील. बाराव्या गुरूची झळ व साडेसातीचा त्रास कमी होईल. तुमच्याच राशीत असलेला गुरू ग्रहाचे प्राबल्य वाढेल. १३ एप्रिल रोजी रवी मेष या उच्च राशीत,मंगळ मिथुन या राशीत प्रवेश करेल. रवी तृतीय स्थानात व मंगळ पंचमस्थानात असेल. नोकरदार वर्गाला नव्या नोकरीविषयी वाटणारी आतुरता पूर्ण होईल. संघर्षदायक परिस्थिती आटोक्यात आल्याने कामात मन लागेल. शास्त्रीय व्यासंग चांगला राहील. लेखन साहित्य क्षेत्रात शुभ परिणाम जाणवू लागतील. बौद्धिक कौशल्य प्रगतिपथावर असेल. आर्थिकदृष्टय़ा मजबुती येईल. हिशोबाची सांगड घालणे आता अवघड होणार नाही. राजकीय क्षेत्रात असलेली धडाडी कायम राहील. घरगुती प्रश्नांचा भार हलका होईल. आरोग्य उत्तम असेल. शुभ दिनांक : १३, १५ महिलांसाठी : नियोजित कामांना गती मिळेल.
-
अनेक क्षेत्रांत कार्यरत_नववर्षांची सुरुवात शुभत्व वाढवणारी असेल. खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. १३ एप्रिल रोजी राशीबदल करणारा रवी धनस्थानात येत आहे. मंगळ मिथुन राशीत चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. नोकरदार वर्गाला कामातील सहनशीलता वाढवावी लागेल. अधिकारी व्यक्तीशी वाद होणार नाही याची काळजी घ्या. व्यापारी क्षेत्र बदलत्या स्वरूपाचे राहील. मोठी झेप तूर्तास टाळा. योग्य विचाराने कृती करा. कर्जाची तरतूद सध्या करू नका. मिळालेल्या उत्पन्नाचे स्रोत गुंतवणुकीत रूपांतर करा. आवक पाहून जावक ठरवा. सार्वजनिक ठिकाणी अनेक क्षेत्रांत कार्यरत राहाल. इतरांच्यात स्वत:हून हस्तक्षेप करणे टाळा. शेजारधर्माशी बोलताना सांभाळून राहा. मानसिक द्विधा अवस्थेतून बाहेर या. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. प्रकृतिस्वास्थ्य जपा. शुभ दिनांक : १३, १६ महिलांसाठी : पाककलेची आवड निर्माण होईल.

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्