-
करोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. (सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)
-
नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही, तोच महाराष्ट्रावर पुन्हा एक आघात झाला आहे.
-
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-
मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे.
-
या रुग्णालयात बुधवारी पहाटे आगीचा भडका उडाला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी रुग्णालयात २० रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात ६ रुग्ण, तर इतर वार्डात १४ रुग्ण होते.
-
आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं.
-
वातानुकूलीत यंत्र आणि व्हेंटिलेटरमुळे रुग्णालयांत वीजेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाच्या आवारात अग्निशमन दलाचे बंब तैनात ठेवण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महापालिका आयुक्तांना दिले. तसेच सध्या वाढत असलेल्या आगीच्या घटना टाळण्यासाठी त्रयस्थ संस्थांमार्फत परिक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम