-
उत्तराखंड : आज सोमवारपासून चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिराचे दरवाजे सकाळी ५ वाजता उघडण्यात आले.
-
मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजाऱ्यांनी विधीवत पूजा केली.
-
उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या (गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) यात्रेला सुरूवात होते.
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रेवेंद्र सिंह रावत यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी निरोगी रहावे अशी मी बाबा केदारनाथला प्रार्थना करतो असे ट्वीट त्यांनी केले आहे.
-
करोनामुळे केदारनाथ येथे येण्यास मनाई असल्याने स्थानिकांना व भाविकांना दर्शनासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – ANI)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग