-
एक, दोन, तीन, चार… गणपतीचा जयजयकार, असा जयघोष मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे.
-
राज्यभरात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे.
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तिसरा गुरुजी तालीम मंडळ, चौथा तुळशीबाग गणपती, पाचवा केसरी वाडा गणपती या पाचही गणपतींचे विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. तर काही ठिकाणी ढोल-ताशाचे वादनही करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदा मात्र गणेश विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळत नाही. करोनामुळे यंदाचा गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे. -
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद राहणार आहे.
-
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
पुण्यातील केसरी वाडा गणपती विसर्जन सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला.
-
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन करण्यात आले.
-
गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, याच जयघोषात अनेक भाविक लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळत आहे.

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर