-
आज पर्यंत अनेक विवाह सोहळे झाले, यापुढेही होतील.पण जर देव देवतेचा विवाह असेल तर…असाच एक शाही विवाह सोहळा पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुख्मिणीचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह संपन्न झाला तोही शाही पद्धतीने.
-
पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे.
-
विठ्ठल व रूक्मिणीमाता विवाह सोहळ्या निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिराच्या
गाभाऱ्यात तसेच नामदेव पायरी व संपुर्ण मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे. -
वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला.
-
मंगल अक्षता,सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळी उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
-
वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता, असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला गेला आहे.
-
हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाज करीत होते.
-
त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहे.
-
हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण देऊळ विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवले सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकारांनी सजवले जाते.
-
साधारणत: सकाळी अकरा वाजता रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला जातो. तिथे गुलालाची उधळण होते.
-
त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे घेऊन जातात. तिथेही गुलालाची उधळण होते.
-
त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी आणली जाते.
-
दोघांनाही मुंडावळय़ा बांधून आणल्या जातात. यानंतर अंतरपाट धरला जातो. उपस्थितांना फुले आणि अक्षदा वाटप केले जाते
-
मंदिरात वेगवेगळ्या फुलाची सुंदर आरास
-
सकाळी श्री विठ्ठल आणि रुख्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुख्मिणी मातेस मोत्याचे दागिने,नथ,हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले.
-
सनई-चौघडय़ासह टाळ, मृदंग, गुलालाची उधळण, अक्षदा, आणि भाविक वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थिती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विवाह सोहळा पार पडला.
-
हा विवाह सोहळा झाल्यावर सायंकाळी दोन्ही मूर्तीची नगरामधून सवाद्य शोभायात्रा काढण्यात येते.
-
सजावटीसाठी निशीगंध, एँथोरीयम, झेंडू, शेवंती, गुलाब, अॉरकेड, कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॕडीओ, जरबेरा, ड्रेसेना, तुळशी अशा १४ प्रकारच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिराचे प्रवेशव्दार, सोळखांबी, सभामंडपसह देवाचा गाभारा फुलांमुळे आकर्षक दिसत होता. (फोटो सौजन्य – मंदिर समिती)
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी