-
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून, एकाचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. (PTI)
-
तीस्ता नदी दुथडी भरून वाहत असून, दक्षिण सिक्कीममधील मेल्ली स्टेडियममध्ये पाणी शिरले आहे आणि अनेक लोक बेघर झाले आहेत. (PTI)
-
भूस्खलनामुळे सिक्कीममधील रस्ते आणि पुलांचे नुकसान झाले आहे, ज्यात मंगन जिल्ह्यातील अप्पर ग्याथांग आणि तरग गावांना जिल्हाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचाही समावेश आहे. (PTI)
-
राष्ट्रीय महामार्ग १० वरील भूस्खलनांमुळे उत्तर सिक्कीमचा देशाच्या इतर भागांपासून संपर्क तुटला आहे, त्यामुळे या भागात प्रवेश करणे कठीण झाले आहे. (PTI)
-
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी घटनेची माहिती घेतली आहे. पीडित आणि पीडित कुटुंबांना तत्काळ पुनर्वसन करण्यासाठी आणि मूलभूत गरजांच्या पूर्सततेसाठी शक्य ती मदत देण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करत आहे. राज्य सरकार या दुर्दैवी घटनेतील पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, पीडीत कुटुंबांना आणि भूस्खलनामुळे बाधित आणि विस्थापित झालेल्या सर्व लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री तमंग यांनी दिले आहे. (PTI)
-
भारतीय हवामान विभागाने जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करून उत्तर बंगालमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुफान वादळाचा अंदाज वर्तवला आहे. (ANI)
-
कोलकातामध्ये शुक्रवार ते सोमवार पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (ANI)
-
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी राज्यातील उत्तर भागातील जिल्ह्यांच्या प्रशासनाला, पोलीस आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना पीडितांसाठी तत्काळ धावून जाण्याचे निर्देश दिले आहेत. (ANI)
-
राज्य सरकारने अद्याप एकूण हानी आणि मृतांची संख्या निश्चित केलेली नाही. दरम्यान, गेल्या वर्षीही ऑक्टोबरमध्ये उत्तर सिक्कीममध्ये हिमनदी सरोवरात आलेल्या पुरामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. (ANI) हेही पहा-PHOTOS : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांचं शिक्षण किती? वाचा माह…

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती