-
भारतीय लष्कराचे जवान शुक्रवारी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग करताना या छायाचित्रात दिसत आहेत. (PTI Photo)
-
आज सिक्कीममध्ये १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या जवानांनी योगासने केली. (PTI Photo)
-
चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ITBP कर्मचारी आणि इतरांनी योगासने केली. (PTI Photo)
-
संस्कृत गुरुकुलचे विद्यार्थी शुक्रवारी फरीदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करताना. (PTI Photo)
-
आग्रा येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त CISF कर्मचारी ताजमहालाजवळ योग करताना दिसत आहेत. (PTI Photo)
-
भारतीय नौदलाचे कर्मचारी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जहाजावर योगासने करताना.(PTI/ Mumbai)
-
भारतीय नौदलाचे आणखी एक छायाचित्र (PTI/ Mumbai)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २१ जून रोजी श्रीनगरमध्ये १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व केले. (PTI Photo)
-
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी लोक श्रीनगर येथे एकत्र आले. हा कार्यक्रम सुरुवातीला दल सरोवराच्या काठावर होणार होता पण पावसामुळे तो आतल्या भागात हलवावा लागला. (PTI Photo)
-
योग दिवसानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाला योगासनांना त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचे आवाहन करतो. योग केल्यामुळे शक्ती, आरोग्य आणि निरोगीपणा वाढतो. श्रीनगरमधील या वर्षीच्या योग कार्यक्रमात सामील होणे माझ्यासाठी एक अद्भुत अनुभूती आहे.” (PTI Photo)
-
नवी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ असलेल्या कर्तव्य पथ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोक योग करताना. (Express Photo by Amit Mehra)
-
देशभरातील योग स्थळांवर थेट प्रक्षेपणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी स्क्रीन लावण्यात आले होते.(Express Photo by Amit Mehra)
-
योगासनांमध्ये योगिक व्यायाम, आसने आणि राजयोग ध्यान यांचा समावेश होता. (Express Photo by Amit Mehra)
-
कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल मैदानावरही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. (Express Photo by Partha Paul)
-
” स्वयं आणि समाजासाठी योग ” स्वयं-शिक्षण आणि आत्म-जागरूकतेच्या पैलूंवर केंद्रित थीमसह १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला. (Express Photo by Partha Paul)
-
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील राजभवन येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली. (PTI Photo)
-
ब्रह्मा कुमारी या संस्थेने दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले होते. (Express Photo by Amit Mehra)
-
लाल किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी सुमारे ५० हजार योग प्रेमींचा मोठा मेळा जमला. (Express Photo by Amit Mehra)
-
सिक्कीममध्ये १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या जवानांनी योगासने केली (PTI Photo)
-
गुजरातमध्ये, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत नडाबेटजवळील भारत-पाक सीमेवरील झिरो पॉइंट येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Express Photo by Nirmal Harindran)
-
विविध सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांसह गुजरातमधील १.२५ कोटीहून अधिक लोक योग दिनाच्या उत्सवात सामील झाले. (Express Photo by Nirmal Harindran)
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालय, मुंबई येथे योगासने केली. (Express Photo by Ganesh Shirsekar)
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत योगासने केली. (Express Photo by Ganesh Shirsekar)
-
मुंबईत १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे नागरिकांनी योगासने केली. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
मुंबई बंदर प्राधिकरण, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेटवे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. (Express photo by Sankhadeep Banerjee)
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहमदाबादमधील गोटीला गार्डन येथे इतरांसोबत योगासने केली. (PTI Photo)
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात योगासने केली. (PTI Photo)
-
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मथुरा येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली. (PTI Photo)
-
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि इतरांनी नवी दिल्ली येथे १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली. (PTI Photo)
-
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि इतरांनी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने केली. (PTI Photo)
-
ठाणे येथील सरकारी रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. (Express Photo by Deepak Joshi)
-
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा आणि इतर अधिकारी १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात योग करताना. (PTI Photo)
-
नवी दिल्लीमध्ये १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोनिया विहार येथील यमुना नदीच्या पाण्यावर खेळाडू योग करताना. (PTI Photo)
-
सीमा सुरक्षा दलचे (बीएसएफ) जवान राजस्थानच्या थार वाळवंटात १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग करताना. (PTI Photo)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल