-
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे.
-
मुंबईतील सायन परिसरातील ही छायाचित्रे आहेत.
-
मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळला.
-
त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या फोटोमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षा बंद झाली. या रिक्षाला रस्त्याच्या बाजूला घेऊन जाताना लोक दिसत आहेत.
-
पावसाच्या संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.
-
कामावर पोहचण्याची घाई आणि जोरदार पावसाचा मारा अशा संकटाला तोंड देत मुंबईकर ऑफिसला पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.
-
रस्त्यांवर अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते.
-
या पाण्यातून वाट काढताना चाकरमानी.
-
पावसाच्या हजेरीने आनंद देखील आहे परंतु जनजीवन विस्कळीत होत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
-
दरम्यान आता या आठवड्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने एक नवा अंदाज वर्तवला आहे.
-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये आजपासून पुढील काही दिवस पावसाची संततधार राहणार आहे.
-
तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
-
सध्याही मुंबईतील उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे.
-
(Photo credit: Express Photos by Amit Chakravarty) हेही वाचा : PHOTOS : मविआचे बडे नेते शरद पवार यांची संपत्ती किती? ‘इथे’ केलीय सर्वाधिक गुंतवणूक, …

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…