-
अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. (पीटीआय)
-
बंदचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. भारत बंदचा सार्वजनिक वाहतूक सेवा आणि रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. (पीटीआय)
-
भारत बंदची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात अनेक ठिकाणी लोक रेल्वे गाड्यांसमोर आंदोलन करत आहेत तर अनेक ठिकाणी लोक सार्वजनिक वाहनांची वाट पाहत उभे आहेत. (पीटीआय)
-
भारत बंददरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. (पीटीआय)
-
भारत बंदचा सर्वाधिक परिणाम झारखंड, बिहार आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहे. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी या काळात लोकांनी सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. (पीटीआय)
-
अनेक राजकीय पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ज्यामध्ये बहुजन समाज पार्टी (BSP), राष्ट्रीय लोकदल (NP), आझाद समाज पार्टी (कांशीराम) आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. (पीटीआय)
-
यादरम्यान काही ठिकाणी निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. (पीटीआय)
-
भारत बंदचे कारण
दरम्यान, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील क्रिमी लेयर वर्गाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवर्गातील गरजू लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. (पीटीआय) -
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. कारण, आधीच लागू केलेल्या आरक्षणांमध्ये हे विशेष आरक्षण आहे. अशा स्थितीत देश बचाओ संघर्ष समितीच्यावतीने देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. (पीटीआय)
Bihar Election Result 2025 Live Updates : बिहारमध्ये NDAचा दणदणीत विजय! भाजपाने ८९ तर जेडीयूने जिंकल्या ८५ जागा