-
Shubhanshu Shukla Axiom 4 Mission Return Journey Details : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात १८ दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर आज (१५ जुलै)पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील सदस्यांनी १८ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधनकार्य केलं. त्यानंतर चारही अंतराळवीर अंतरराष्ट्रीय स्थानकामधून सोमवारी (१४ जुलै) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते. दुपारी तीन वाजता अंतराळवीर पृथ्वीवर परतले. (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
अवकाशयान निघाले- सायंकाळी ४.४५ वा. (नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशीर). (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
‘अॅक्सिऑम-४’ मोहिमेतील सहभागी अंतराळवीर – ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (सारथ्य), पेगी व्हाइटसन (मोहिमेचे नेतृत्व), स्लावोझ उइनान्स्की (पोलंड) आणि टिबर कापू (हंगेरी) (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
अंतराळवीर ४३३ तास (१८ दिवस) अंतराळ स्थानकात राहिले. तसेच त्यांनी पृथ्वीभोवती कक्षेत २८८ फेऱ्या मारल्या. (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
अंतराळात पोहोचल्यापासून त्यांनी तब्बल सुमारे ७६ लाख मैल अंतर कापले. (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
पृथ्वीच्या वातावरणात येताना अवकाशयानाने १६०० डिग्री सेल्सिअस तापमानात प्रवास केला. (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
पॅराशूटच्या साहाय्याने दोन टप्प्यांत अंतराळवीर पृथ्वीवर उतरले. (Image Source: Axiom Space/ YouTube)
-
अंतराळवीर मंगळवारी दुपारी ३.०१ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले. (Image Source: All India Radio)
-
आता या अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांनी ही मोहीम यशस्वी पार पडल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (Image Source: All India Radio)

Fees Of Private Schools: “मुलांना खासगी शाळेत पाठवणं थांबवा”, मध्यमवर्गीयांना बुडवणारं गणित चार्टर्ड अकाउंटंटनं उलगडलं