-
New Income Tax Bill : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केलं आहे. या नवीन आयकर विधेयकात काही बदल करण्यात आले आहेत.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने १३ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केलेल्या आयकर विधेयकात काही बदल सुचवण्यात आले होते. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : आज ११ ऑगस्ट रोजी लोकसभेत सुधारित नवीन आयकर विधेयक २०२५ आणि कर कायदा (सुधारणा) विधेयक २०२५ मंजूर करण्यात आलं आहे.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : आता मागील वर्ष आणि कर निर्धारण वर्ष ऐवजी कर वर्ष ही एकच संकल्पना असेल. अनावश्यक आणि परस्परविरोधी तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : डिजिटल युगानुसार नियम बनवण्यासाठी सीबीडीटीला अधिक अधिकार देण्यात आलेत. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर नवीन कायदा जुन्यापेक्षा समजण्साठी सोपा असेल. (फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : उशिरा रिटर्न भरल्यासही परतावा मिळणार : नव्या कायद्यानुसार उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना देखील परतावा मिळणार आहे. समितीने यामध्ये बदल करण्याची शिफारस केली होती.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : शून्य टीडीएसचा पर्याय : नव्या कायद्यामध्ये शून्य टीडीएस पर्याय देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कर दायित्व नाही त्यांना शून्य-टीडीएस प्रमाणपत्र मिळू शकेल.(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
Income Tax Bill : आयकर कायदा १९६१ ची जागा घेण्यासाठी आयकर (क्रमांक २) विधेयक, २०२५ तयार करण्यात आलं असून हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. आता राज्यसभा आणि त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल..(फोटो-फायनान्शिअल एक्स्प्रेस)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम