-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीवरून सलग १२ व्यांदा देशाला संबोधित करताना भगवा पगडी परिधान केली. (Photo – PTI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी १०३ मिनिटांच्या भाषणात विविध विषयांना हात घातला. ट्रम्प यांच्याकडून लादले जाणारे टॅरिफ, शेजारी देश पाकिस्तान-चीनची मुजोरी, देशाअंतर्गत प्रश्न तसेच भारताच्या भविष्याबद्दलच्या योजना अशा मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर भाष्य केले. (Photo – PTI)
-
मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात परिधान केलेल्या पगड्या आता एक विशिष्ट परंपरेच्या भाग बनल्या आहेत. गेल्या वर्षी, त्यांनी नारिंगी, पिवळा आणि हिरव्या रंगातील एक चमकदार राजस्थानी लेहरिया पगडी निवडली होती. (Photo – PTI)
-
२०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करताना लाल जोधपुरी बंधेज पगडी परिधान केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पिवळ्या आणि बहुरंगी क्रिसक्रॉस पगडीपासून ते २०१६ मध्ये गुलाबी-पिवळ्या टाय-अँड डाई पगडीपर्यंत आणि २०१७ मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती. (फाइल फोटो)
-
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेही त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या पगड्या घातल्या होत्या. २०२१ च्या उत्सवासाठी, त्यांनी गुजरातमधील जामनगर येथील पिवळ्या ठिपक्यांची चमकदार लाल बंधेज हेडगियर पगडी परिधान केली होती. (फाइल फोटो)
-
२०२२ च्या प्रजासत्ताक दिनासाठी, मोदींनी गुलाबी आणि पिवळ्या रंगात टाय-अँड-डाय प्रकारातली पगडी निवडली होती. Photo – PTI)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा