-
VIP Security in India : प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक किंवा क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची? याचा निर्णय सरकार घेत असतं.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : भारतात पुरवल्या जाणाऱ्या सुरक्षेमध्ये ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. ही सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिली जाते.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : कोणाला पुरवली जाते ही सुरक्षा? : देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘झेड प्लस’(Z+), एएसएल (ASL), झेड (Z), वाय प्लस (Y+), वाय (Y) आणि एक्स (X) अशा दर्जाची सुरक्षा दिली जाते. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रेटी, उद्योगपती यांच्यासह देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि ज्यांच्या जीवाला धोका असतो अशा व्यक्तींना ही व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरवली जाते.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : झेड दर्जाच्या सुरक्षेमध्ये २२ जण सुरक्षेसाठी तैनात असतात. यात चार तेच पाच एनएसजी कमांडो असतात. राज्य सरकार किंवा सीआरपीएफकडून अतिरिक्त सुरक्षा दिली जाते. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : झेड प्लस कॅटेगरीमध्ये सुरक्षेसाठी ३६ जण तैनात असतात. यात दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. एसपीजी नंतर हे दुसऱ्या दर्जाचे सुरक्षा कवच आहे. सर्व कमांडो अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि उपकरणांनी सुसज्ज असतात.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : दरम्यान एखाद्या मोठ्या नेत्याला किंवा आणखी कोणत्या एखाद्या सुरक्षा असलेल्या मोठ्या व्यक्तीला जेव्हा अटक होते तेव्हा त्या झेड प्लस सुरक्षेचं काय होतं? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव पोलिसांनी अटक केलं तर त्या व्यक्तीला असलेल्या सुरक्षेचं काय होतं? याची माहिती एका वरिष्ठ सेवारत आयपीएस अधिकाऱ्याशी बोलून इंडिया टुडेने एका वृत्तात दिली आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : एका सेवारत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “व्हीआयपी सुरक्षा असलेल्या व्यक्तीला अटक होते तेव्हा ते सुरक्षा कर्मचारी पोलीस स्टेशनच्या आवाराबाहेर राहतात. व्यक्तीची सुटका झाल्यानंतर पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी त्या व्यक्तीला परत रिपोर्ट करतात.”(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
VIP Security in India : “तसेच अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची सुटका झाल्यानंतर सुरक्षा विभाग ताबडतोब त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेते,” असे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)