-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कातील अँकोरेज येथील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे भेटले. युक्रेनमधील युद्धावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली. या चर्चेत शांततेचा मार्ग मोकळा होण्याची आशा होती, परंतु कोणताही ठोस युद्धबंदी करार न होता बैठक संपली. (Photo Source: Associated Press)
-
ट्रम्प आणि पुतिन हे लढाऊ विमानांच्या देखरेखीखाली आणि जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे रेड कार्पेट समारंभात पोहोचले. (Photo Source: Associated Press)
-
राष्ट्रपती ट्रम्प यांच्या लिमोझिनमध्ये एकत्र बसण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले. दोन्ही राष्ट्रपतींनी बंद दाराआड चर्चा करण्याआधीचा हा क्षण टिपण्यात आला. (Photo Source: Associated Press)
-
शिखर परिषदेच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, पुतिन यांनी अलास्कातील दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकाला भेट दिली आणि श्रद्धांजली वाहिली. (Photo Source: Associated Press)
-
जागतिक नेत्यांसह त्यांचे दोन वरिष्ठ सहाय्यक होते. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ ट्रम्प यांच्याबरोबर होते. पुतिन यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार युरी उशाकोव्ह होते. (Photo Source: Associated Press)
-
पत्रकार परिषदेत पुतिन यांना युक्रेनमधील नागरिकांच्या मृत्यूंबद्दलच्या रोखठोक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. पत्रकारांनी जीवित हानीबद्दल जबाबदारी स्वीकारण्यास आणि कबुली जबाब मागितला असता पुतिन यांनी सविस्तर उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. (Photo Source: Associated Press)
-
पत्रकार परिषदेनंतर सार्वजनिक भाषणात पुतिन यांनी युक्रेन आणि युरोपीय राष्ट्रांना शांतता प्रयत्नांमध्ये अडथळा आणू नये, असा इशारा दिला. प्रादेशिक मुद्द्यांवरील रशियाची भूमिका कायम ठेवताना त्यांनी आपल्या प्रादेशिक जबाबदारीवर भर दिला. (Photo Source: Associated Press)
-
अलास्का शिखर परिषद युद्धबंदी करार किंवा बंधनकारक वचनबद्धतेशिवाय संपली, ज्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती जैसे थे राहिल, अशी भीती निर्माण झाली. पुतिन यांनी इंग्रजी बोलताना संकेत दिले की, भविष्यातील चर्चा मॉस्कोमध्ये होऊ शकते. (Photo Source: Associated Press)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख