-
देशभरात सायबर फसवणुकीच्या अनेक घटना दररोज घडतात. आयुष्यभर पोटाला चिमटा काढून पै पै जमावलेल्या रकमेवर एका क्षणात सायबर गुन्हेगार दरोडा टाकतात. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
देशभरात सायबर फसवणुकीच्या घटनांत सायबर चोरटे आता वेगवेगळ्या पद्धती वापरताना दिसत आहेत. ई-चलनच्या माध्यमातूनही काही फसवणुकीच्या घटना घटल्याची माहिती आता समोर येत आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
ट्रॅफिक चलनच्या संदर्भात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणं टाळलं पाहिजे. ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीच्या घटना कशा टाळल्या पाहिजेत? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
कसा होतो ई चलन घोटाळा? : तुम्हाला एक एसएमएस येतो, जो ट्रॅफिक पोलिसांकडून आला आहे असं दिसतं आणि तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकता.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा, असा इशारा सरकारने जारी केला आहे, म्हणून लक्षात ठेवा, जर एखादे ट्रॅफिक चलन संशयास्पद दिसत असेल त्यावर क्लिक करणं टाळा. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
अधिकृत URL जाणून घ्या: कायदेशीर ई-चलन आणि ट्रॅफिक अथॉरिटी वेबसाइट्स फक्त ‘.in’च नव्हे तर ‘gov.in’ ने समाप्त होतात. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
सतर्क राहा : जर एखादा संदेश पेमेंट तपशील, आधार कार्ड क्रमांक किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती विचारत असेल तर नेहमी सावध राहा. कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी वेबसाइट्स किंवा ॲप्सची पडताळणी करा.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
इ चलन घोटाळ्यांने अनेकांची झोप उडवली आहे. तुमची अशी फसवणूक होणे टाळू शकता. त्यामुळे वरील टीप्स नेहमी लक्षात ठेवा. (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
-
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, देशभरातील सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून आता अशा प्रकारची नवीन पद्धत वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.(फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया