-
भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्यावरून काहीसा तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे चीन-आणि भारतामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. (फोटो-एएनआय)
-
पंतप्रधान मोदी तब्बल ७ वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी हे सध्या तिआंजिनमध्ये दाखल झाले असून ते शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत सहभागी झाले आहेत. (फोटो सोर्स-एएनआय)
-
पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक महत्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा पार पडली आहे. (फोटो सोर्स-एएनआय)
-
परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशातील संबंध पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मोदींनी या बैठकीत स्पष्ट केलं आहे. (फोटो सोर्स-जनसत्ता)
-
“सीमा व्यवस्थापनाबाबत आमच्या विशेष प्रतिनिधींमध्ये एक करार झाला. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली. दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे देखील पुन्हा सुरू होत आहेत”, असं मोदींनी म्हटलं.(फोटो सोर्स-जनसत्ता)
-
“दोन्ही देशांच्या २.८ अब्ज लोकांचे हित आमच्या सहकार्याशी जोडलेले आहे. सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर शांतता आणि स्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे”, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.(फोटो सोर्स-पंतप्रधान मोदी सोशल मीडिया)
-
शी जिनपिंग यांनी म्हटलं की, “चीन आणि भारत ही दोन प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. जग एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत.”(फोटो सोर्स-पंतप्रधान मोदी सोशल मीडिया)
-
“आपल्या दोन्ही देश कल्याण व जीवन सुधारण्याची तथा विकसनशील देशांची एकता आणि पुनरुज्जीवन वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची जबाबदारी आपण घेतो”, असं शी जिनपिंग यावेळी म्हणाले. (फोटो सोर्स-संग्रहित छायाचित्र)
-
“चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणे, एकमेकांच्या यशाला सक्षम करणारे चांगले शेजारी असणे आणि ड्रॅगन व हत्ती एकत्र येणे हे खूप महत्वाचे आहे”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.(फोटो सोर्स-एएनआय)