-
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन चालताना आपल्याला दिसतात. देशसेवा करणाऱ्या अशा एक महिला अधिकारी आहेत ज्यांचं नावही एकून गुन्हेगार आणि दहतवाद्यांचाही थरकाप उडतो. त्यांचं नाव आहे संजुक्ता पराशर. संजुक्ता या आसाममध्ये आयर्न लेडी आणि लेडी सिंघम म्हणून परिचित आहेत. (सर्व फोटो – फेसबुक)
-
आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर या आरामच्याच रहिवासी आहे. तसंच त्या २००६ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
-
आसाममध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्या दिल्लीत आल्या. त्यांनी दिल्लीतील इंद्रप्रस्थ कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी जेएनयूमधून इंटरनॅशन रिलेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये MPhil आणि Phd केलं.
-
जेएनयूमधून शिक्षण पूर्ण करतानाच त्या युपीएससीचीदेखील तयारी करत होत्या. २००६ मध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली.
-
युपीएससीच्या परीक्षेत त्यांचा ८५ वा क्रमांक आला. त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घएतला आणि त्यानंतर त्यांची आसाम मेघालय कॅडरसाठी निवड करण्यात आली.
-
संजुक्ता यांना २००८ मध्ये आसामच्या माकुम जिल्ह्यात असिस्टंट कमाडेंट म्हणून पहिली फिल्ड पोस्टींग मिळाली.
-
त्यानंतर उदालगिरीमध्ये झालेल्या बोडो आणि बांगलादेशी लोकांची जातीय हिंसा नियंत्रणात आणण्याचं काम सोपवण्यात आलं.
-
संजुक्ता यांनी केवळ १५ महिन्यांच्या कालावधीत १६ दहशतवाद्यांना ठार केलं. तर ६४ पेक्षा अधिक दहशतवाद्यांची तुरूंगात रवानगी केली. हाती एके ४७ घेऊन त्या स्वत: जंगलात कॉम्बिंग करतात.
-
संजुक्ता यांनी आयएएस अधिकारी पुरू गुप्ता यांच्याशी विवाहगाठ बांधली आहे. त्यांचा एक लहान मुलगादेखील आहे.
-
दरम्यान, दोन महिन्यातून एकदाच आपल्याला कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळत असल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी