-
(संग्रहित छायाचित्र)
-
वाढीव वीज बिलाचा फटका फक्त सर्वसामान्यच नाही तर सेलिब्रेटींनाही बसत असल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नूला तब्बल ३६ हजारांची वीज बिल आलं आहे. तापसीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे. “लॉकडाउनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?,” अशी संतप्त विचारणा तापसीने ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावेळी तापसीने अदानी वीज कंपनीला टॅगही केलं आहे.
-
बरं हे केवळ तापसीपूर्ण मर्यादित नसून अनेकांनी ट्विटवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. कंपन्यांच्या सोशल हॅण्डलला टॅग करत अनेकांनी तक्रार केली आहे. तर काहींनी मात्र या आर्थिक संकटात खिसा कापणाऱ्या शॉकिंग न्यूजवरही मिम्स शेअर केले आहेत.
-
एवढे पैसे कुठून आणायचे रे…
-
पगारापेक्षा वीज बिल अधिक आल्यावर
-
एवढं बिल कसं आलं याचा हिशेब लावताना
-
बिल पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया
-
किती बिल आलं?
-
तिप्पट बिल द्यावं लागेल
-
बिलं का वाढली: टाळेबंदीच्या काळात वाढलेला वीजवापर आणि एप्रिलपासून वाढलेले वीजदर यामुळे वीज देयकांत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे आधीच्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापर यांच्यातील फरकाची रक्कमही देयकांत जोडण्यात आल्याने नागरिकांवर भार वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.
-
वीज वापर वाढला: करोनामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्याने महावितरणने गेले दोन महिने ग्राहकांना सरासरी वीज देयके पाठवली. मार्चमध्ये वीजवापराची नोंदणी घेणे, मीटरवाचन बंद पडल्याने सरासरीसाठी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांतील वीजवापर गृहीत धरला गेला. त्या काळात थंडीमुळे वातानुकू लन यंत्रे, पंखे यांचा वीजवापर तुलनेत कमी असतो. मात्र एप्रिल, मे व जून महिन्यात वाढत्या उन्हामुळे वीजवापर वाढतो. एरवीसुद्धा उन्हाळ्यात घरगुती ग्राहकांचा वीजवापर किमान ३० ते ४० टक्के वाढतो. त्यातच टाळेबंदीमुळे यंदा या महिन्यांत नागरिक घरांतच असल्याने विजेचा वापर आणखी वाढला.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक