-
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.
-
अयोध्येत यापूर्वीही अनेक पंतप्रधान गेले, पण त्यांनी राज जन्मभूमीपासून स्वतःला दूर ठेवलं. त्याचं एक कारण म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असणं. (Express archive photo)
-
देशाला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी या १९६६मध्ये अयोध्येच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. एका कार्यक्रमात सहभागी होऊन त्या परतल्या. (Express archive photo)
-
त्यानंतर १९७९मध्ये दुसऱ्यांदा इंदिरा गांधी अयोध्येत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हनुमानगढी येथे जाऊन पूजा केली केली होती. (Express archive photo)
-
१९७५मध्ये इंदिरा गांधी या तिसऱ्यांदा अयोध्येच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. आचार्य नरेंद्रदेव कृषि आणि तंत्रशिक्षण विद्यापीठाची पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आली होती. (Express archive photo)
-
यावेळी इंदिरा गांधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पुन्हा दिल्लीला परतल्या होत्या. तिन्ही वेळेला इंदिरा गांधी यांनी राम जन्मभूमीपासून अंतर राखलं होतं. (Express archive photo)
-
राजीव गांधी यांनी दोन वेळा पंतप्रधान असताना आणि एक वेळ माजी पंतप्रधान असताना अयोध्येचा दौऱा केला होता. (Express archive photo)
-
राजीव गांधी पंतप्रधान असतानाच १९८६ मध्ये बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यात आलं. त्यानंतर १९८९ मध्ये राम मंदिराची पायाभरणीही करण्यात आली होती. (Express archive photo)
-
१९८४ मध्ये राजीव गांधी यांनी अयोध्येत निवडणूक प्रसार सभा घेतली होती. त्याचबरोबर १९८९मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रसाराची सुरूवात त्यांनी अयोध्येत सभा घेऊन केली होती. (Express archive photo)
-
विरोधी बाकावर असताना राजीव गांधी १९९०मध्ये सद्भावना यात्रेदरम्यान अयोध्येत आले होते. त्यावेळीही राजीव गांधी हे राम जन्मभूमीपासून दूर राहिले. महत्त्वाचं म्हणजे २०१६ मध्ये राहुल गांधी, तर २०१९ मध्ये प्रियंका गांधी यांनी हनुमानगढी येथे जाऊन पूजा करून दर्शन घेतलं होतं. (Express archive photo)
-
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे सुद्धा रामलल्लाचं दर्शन घेऊ शकले नाही. २००३ मध्ये राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या रामचंद्रदास परमहंस यांचं निधन झाल्यानंतर वाजपेयी अयोध्येत आले होते. (Express archive photo)
-
शरयूच्या किनाऱ्यावर परमहंस यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यावेळी वाजपेयी असं म्हणाले होते की, राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होईल. (Express archive photo)
-
२००३मध्ये अयोध्या, गोरखपूर आणि पूर्वांचलला जोडण्यासाठी शरयू नदीवर उभारण्यात आलेल्या रेल्वे पूलाच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. (Express archive photo)
-
शरयूवर उभारण्यात आलेल्या दुसऱ्या पूलांचं आणि सुवर्ण चतुर्भुज योजनेद्वारे अयोध्येला जोडण्याचं कामही अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. (Express archive photo)
-
२००४ साली त्यांनी फैजाबाद विमानतळाजवळ पंतप्रधान असताना प्रचार सभेला संबोधित केलं होतं. या सगळ्या दौऱ्यांच्या काळात वाजपेयी यांनीही राम जन्मभूमीपासून अंतर ठेवलं होतं. (Express archive photo)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS