-
भारतीयांना विजयोत्सवाची आनंद देणारा माही अर्थात एमएस धोनी मैदानाबाहेर गेलाय. धोनीनं निवृत्ती घेत असल्याचं शनिवारी रात्री जाहीर केलं. त्यानंतर त्याच्या करोडो चाहत्यांनी त्यांच्याविषयी वाटणाऱ्या मनातील भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताला चषक मिळवून देणाऱ्या धोनीचे अनेकजण कट्टर चाहते आहेत. तुम्हीही असाल, तर मग धोनीबद्दलच्या या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. (फोटो सौजन्य – Illustration: C R Sasikumar/Indian express)
-
दुर्दैवी योगायोग असा की, निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी झालेल्या शेवटच्या सामन्यातही धोनी धावबादच झाला होता. २०१९मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात न्युझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्टिलनं धोनीला धावबाद केलं होतं. त्यामुळे भारताला विश्वचषकाच स्पर्धेतून बाहेर जावं लागलं होतं. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
क्रिकेटआधी धोनीला फुटबॉलची आवड होती. शाळेत शिकत असताना धोनी गोलकीपर होता. फुटबॉलविषयी असलेल्या आवडीमुळेच त्याने इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नई एफसी हा संघ खरेदी केला होता. क्रिकेट, फुटबॉलबरोबर धोनीला बॅडमिंटन आवडते. (फोटो सौजन्य – PTI)
-
धोनीला मोटर रेसिंग बाईकची देखील आवड आहे. विविध प्रकारच्या बाईक धोनीकडे आहेत. विशेष म्हणजे मोटर रेसिंगमध्ये त्याने माही रेसिंग नावाची टीमही खरेदी केलेली आहे. (फोटो सौजन्य – PTI)
-
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील चषक जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनी कर्णधार असतानाच भारतीय संघानं २००७ मध्ये आयसीसी टी-२० विश्वकप, २०११मध्ये एक दिवसीय विश्वकप आणि २०१३मध्ये चॅपियन्स ट्रॉफी पटकावली होती. (फोटो सौजन्य – Indian express)
-
धोनीला २०११मध्ये भारतीय लष्कराकडून लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी बहाल करण्यात आली. लष्करात जाण्याचं आपलं स्वप्न होतं, असं धोनीनं बोलूनही दाखवलं होतं. यानिमित्तानं त्यांची इच्छा पूर्ण झाली. (फोटो सौजन्य – Indian express)
-
धोनीला दुचाकींचंही वेड आहे. त्यांच्याकडे दोन डझनाहून अधिक दुचाकी आहेत. विशेष म्हणजे मॅन ऑफ द मॅचमध्ये गाडी मिळाल्यानंतर तो हमखास ती घेऊन मैदानावर फिरायचा. (फोटो सौजन्य – )
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धोनीची सगळ्यात जास्त चर्चा व्हायची त्यांच्या हेअर स्टाईलची. लांब केसामुळे तो प्रसिद्ध झाला होता. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी तर धोनीला केस न कापण्याचा सल्ला दिला होता. मात्र,२०११ नंतर धोनीनं हेअर स्टाईल बदलली. धोनीला जॉन अब्राहमचे केस आवडतात. (फोटो सौजन्य – )
-
धोनीला क्रिकेट खेळत असतानाच पहिली नोकरी मिळाली ती रेल्वेत. तिकीट कलेक्टर म्हणून तो काम करायचा. त्यानंतर त्याने एअर इंडियातही नोकरी केली होती. त्याचबरोबर एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट्स कंपनीतही तो भागीदार झाला. (फोटो सौजन्य – AP)
-
धोनी जगातील सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू राहिला आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी धोनीचं वर्षाला सरासरी उत्पन्न १५० ते १९० कोटी रुपये इतकं होतं. (फोटो सौजन्य – BCCI)
-
शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट. ज्यामुळे धोनीचा सुरूवातीच्या आयुष्यातील संघर्ष घराघरात पोहोचला, ती म्हणजे त्यांच्या आयुष्यावर आलेला सिनेमा. एमएस धोनी अनटोल्ड स्टोरी. या सिनेमात सुशांत सिंह राजपूतनं त्याची भूमिका केली होती. दुर्दैवानं धोनीच्या निवृत्तीचा साक्षीदार सुशांतला होता आलं नाही. (फोटो सौजन्य – Indian express)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक