-
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने आता थेट एका लघुग्रहावर (अॅस्टेरॉईड) यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या लघुग्रहावर हे यान पाठवलं जाणार आहे तो इतर लघुग्रहांपेक्षा वेगळा आहे. हा लघुग्रह लोह, निकेल आणि सोन्यापासून बनलेला असल्याचे संशोधनामधून समोर आलं आहे. या लघुग्रहावरील धातू विकले तर पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काही हजार कोटी रुपये मिळतील. या लघुग्रहाची एकूण किंमत ही जागतिक अर्थव्यवस्थेहूनही अधिक आहे. (फोटोः NASA/Psyche)
-
नासाने या लघुग्रहाचे नाव १६ साइकी (16 Psyche) असं ठेवलं आहे. या लघुग्रहावर असणारे लोह हे एकूण १०००० क्वाड्रिलियन पाउंड इतकी आहे. म्हणजेच १०००० वर १५ शून्य. या लघुग्रहावर संशोधन करणाऱ्या अंतराळयानाचे नावही साइकी असच ठेवण्यात आलं आहे. (फोटोः NASA/Psyche)
-
नासाचे हे अंतराळयान २२६ किमी लांबीच्या साइकी या लघुग्रहाचा अभ्यास करेल. या अंतराळयानाच्या डिझायनिंगचे काम पूर्ण झालं आहे. (फोटोः NASA/Psyche)
-
साइकी हा लघुग्रह मंगळ आणि गुरु या दोन मोठ्या ग्रहांच्यादरम्यान असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्ट्यामध्ये आहे.
-
'इंडियाटाइम्स डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार साइकी या लघुग्रहावरील लोहाचे प्रमाण एवढे आहे की ते विकून पृथ्वीवरील प्रत्येकाला पैसे वाटल्यास प्रत्येकाच्या वाट्याला १० हजार कोटी रुपये येतील. (फोटोः NASA/Psyche)
-
नासाने या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी स्पेस एक्स कंपनीचा मालिक एलॉन मस्ककडेही यासंदर्भात मोहीम सुरु करण्याचा मागणी केल्याचे वृत्तही समोर येत आहे. या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी स्पेस एक्सने एक नासाबरोबर संयुक्त मोहीमेमध्ये सहभागी व्हावे अशी नासाची इच्छा असल्याचे समजते. (फोटोः NASA/Psyche)
-
१६ साइकी हा लघुग्रह पाच वर्षांमध्ये सुर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. या लघुग्रहावरील एक दिवस हा ४.१९६ तासांचा असतो. या लघुग्रहाचे वजन आपल्या चंद्राच्या वजनाच्या एक टक्के आहे.
-
साइकी या लघुग्रहाला पृथ्वीच्या जवळ आणण्याची योजनेबद्दल सध्या नासाचा कोणताही विचार सुरु नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी त्यावर यान पाठवण्याची योजना सुरु असल्याचेही सांगण्यात आलं आहे. (फोटोः NASA/Psyche)
-
ऑगस्ट २०२२ मध्ये साइकी लघुग्रहावर अंतराळयान पाठवण्याचा नासाचा विचार आहे. स्पेस एक्सने नासाला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि या यानामधून एखादी रोबोटिक मशीन या लघुग्रहाच्या अभ्यासाठी त्याच्या भूपृष्ठावर उतरवली तर तेथील माहिती पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागेल. (फोटोः NASA/Psyche)
-
सामान्यपणे कोणत्याही लघुग्रह हा बर्फ आणि दगडांपासून बनलेला असतो. मात्र १६ साइकीचा पृष्ठभाग हा पूर्णपणे धातूपासून बनलेला आहे. या लघुग्रहाच्या गर्भामध्ये पृथ्वीप्रमाणेच तप्त धातू असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. हा लघुग्रह पूर्वी एक ग्रह असण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. सतत या ग्रहावर अंतराळातील इतर वस्तूंचा मारा झाल्याने त्याची झीज झाली असावी किंवा इतर काही कारणांनी तो सध्याच्या आकाराइतका लहान झाला असावा असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. (फोटोः NASA/Psyche)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग