-
मध्य प्रदेशमधील इंदूर शहरातील परदेशीपुरा भागामध्ये भंडारी पूल परिसारात एक अल्पवयीन तरुणी रस्त्यावरील होर्डींगवर जाऊन बसल्याची घटना रविवारी समोर आली. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
-
आपल्या प्रियकराशीच आपल्याला लग्न करायचं आहे असा या तरुणीचा हट्टा होता.
-
परदेशीपुरा पोलीस स्थानकातील मुख्य अधिकारी असणाऱ्या अशोक पट्टीदार यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.
-
"आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्यास आईचा विरोध असल्याने ही अल्पवयीन मुलगी होर्डींगवर चढली होती," असं अशोक यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
-
या मुलीला समजवण्यासाठी खाली रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर पोलिसांनी या मुलीच्या प्रियकराच्या मदतीने तिची समजूत घातली आणि यशस्वीपणे तिला होर्डींगवरुन खाली उतरण्यास भाग पाडलं

“पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून RSS बद्दल खोटं बोलले”, काँग्रेसचा घणाघात