-
करोनाच्या संकटानं सुरू झालेलं २०२० हे वर्ष आता मावळतीकडे निघालं आहे. काही दिवसात नव्या वर्षाची पहाट उजाडेल. पण, त्याआधी गेल्या वर्षभरात काय झालं यांचा धांडोळाही घेणं सुरू झालं आहे. सध्या युग तंत्रज्ञानाचं असल्यानं कोणतीही शंका मनात आली की, कुणीही पटकन गुगल सर्च करून उत्तर मिळवतो. गेल्या वर्षभरात भारतीयांना कोणत्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता होती? काय सर्वाधिक सर्च केलं? याची माहिती गुगलने आता जाहीर केली आहे. (छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)
-
वर्षाच्या सुरूवातीलाच भारतात करोनानं शिरकाव केला. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. त्यावेळी जगभरातील माणसं करोनाविषयी गुगलवरून जाणून घेत होते. मात्र, भारतात वेगळी सर्च करणं सुरू होतं. भारतात करोनाविषयी माहिती सर्च केली जात नव्हती. तर लोकांना आयपीएलविषयी जाणून घेण्यात उत्सुकता होती. भारतात लोकांनी सर्वाधिक आयपीएलविषयी सर्च केलं.
-
गुगल सर्च क्वेरीमध्ये (माहिती) पहिल्या क्रमांकावर आयपीएलचा विषय होता.
-
भारतात टॉप ट्रेंडिंग व्यक्तींमध्ये भारतात अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि संपादक अर्णब गोस्वामी हे दोघे ठरले. भारतीयांनी यांच्याविषयी सर्वाधिक माहिती सर्च केली.
-
२०२० मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या सिनेमामध्ये दिल बेचारा व सुरारी पोट्रू पहिल्या क्रमांकावर आहेत.
-
वेब सीरिजविषयी बोलायचं झालं, तर मनी 'मनी हाइस्ट आणि १९९२ हर्षद मेहता स्टोरी या दोन्ही सीरिज विषयी सर्वाधिक सर्च केलं गेलं.
-
गुगलच्या माहितीप्रमाणे भारतीयांनी आयपीएल व करोना व्हायरसबरोबरच अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीविषयी मोठ्या प्रमाणात सर्च करून माहिती घेतली. त्याचबरोबर दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीविषयीही गुगल सर्च केलं गेलं.
-
जो बायडेन व अर्णब गोस्वामी यांच्यानंतर गायिका कनिका कपूरला सर्वाधिक सर्च केलं गेलं. अमिताभ बच्चन, कंगना रणौत, रिया चक्रवर्ती व अंकिता लोखंडे हे कलाकार टॉप सर्च ट्रेंडमध्ये राहिले.
-
How to आणि What is अशी प्रश्नार्थक माहितीही भारतीयांनी गुगलवर सर्च केली. गुगलच्या माहितीप्रमाणे यातून हे दिसत की, करोनामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तीकडून अशा पद्धतीची माहिती सर्च केली गेली.
-
जसं की पनीर कसं बनवायचं? रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची? What is binod, what is plasma therapy अशा पद्धती माहितीही भारतीयांनी मोठ्या प्रमाणात सर्च केली. (छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक