-
Age is just a number अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना पाहिल्यावर या म्हणीची आवर्जून आठवण होते. अशाच सदाबहार कलाकारांपैकी आघाडीचं नाव म्हणजे अभिनेता अनिल कपूर. अनिल कपूर यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही अनिल कपूर यांची फिटनेस तरुणाईला लाजवेल अशी आहे. फिटनेसबरोबरच अनिल कपूर हे त्यांच्या भूमिकांसाठी आणि १९८० च्या दशकापासून आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांमधील संवादांसाठी ओळखले जातात. मात्र आजच्या इंटरनेटच्या जामान्यामध्येही अनिल कपूर हे त्यांच्या एका चित्रपटामधील भन्नाट संवादांमुळे मिम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांसमोर कायम येत असतात. हा चित्रपट म्हणजे वेलकम.
-
नाना पाटेकर, अनिल कपूर आणि अक्षय कुमार यांच्या भन्नाट अभिनय असलेला वेलकम हा कधीही सुरु करा आणि पाहा अशा पद्धतीचा चित्रपट आहे. अगदी हलक्यापुलक्या स्वरुपाची गोष्ट आणि त्यातही वापरण्यात आलेले भन्नाट संवाद त्यामुळेच प्रदर्शनानंतर आजही या चित्रपटांमधील अनेक संवाद हे मिम्स म्हणून वापरले जातात. खास करुन मजनू भाईची भूमिका साकारणाऱ्या अनिल कपूर यांचे अनेक संवाद हे मिम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांना अनेकदा दिसतात. अशाच काही मिम्सची ही गॅलरी अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त…
-
मजनू भाईचं हे अजराम चित्र कसं विसरता येईल.
-
कोणाचाही अपमान करण्यासाठी उत्तम मिम…
-
एखादा खूपच संतापला असेल तर…
-
आपल्या जवळच्या मित्राबद्दल अगदी मोजक्या शब्दात भावना व्यक्त करायच्या झाल्यास हे शब्द पुरेसे आहेत.
-
हे खूपच हृदय'स्पर्शी' मिम आहे नाही का?
-
जेवढी भन्नाट भूमिका तेवढाच भन्नाट गॉगल
-
एखादा मित्र प्रेमात पडल्यावर
-
सगळीकडे टोळक्याला घेऊन फिरण्याची सवय असलेला मित्र
-
कोणत्या तरी फ्रेण्ड ऑफ फ्रेण्डने आपल्या फेसबुक कमेंटवरुन वाद सुरु केल्यास
-
कोणत्याही उत्तर न सापडलेल्या गोष्टीसाठी…
-
कोणत्याही मित्राला बाटलीत उतरवण्यासाठी
-
वेलकममधील मिम्सशिवायही अनिल कपूर यांचे काही मिम्स व्हायरल होत असतात. त्यापैकीच हा एक.
-
दर वर्षी १४ नोव्हेंबरला फेसबुकच्या एखाद्या तरी मिम्सच्या पेजवर दिसणारा हा फोटो
-
फेसबुकवर वाद संपवण्यासाठी एवढं म्हटलं तरी पुरे, नाही का? (सर्व फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग