-
मध्य प्रदेशमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने चक्क स्वत:च्या स्कुटरवर छोटं ग्रंथालय सुरु केलं आहे. हा शिक्षक सध्या सागर शहराच्या आरपासच्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरुन लहान मुलांच्या शिकवण्या घेतोय. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
-
सी. एच. श्रीवास्तवर असं या शिक्षकाचं नावं आहे. "येथील अनेक मुलं ही गरीब कुटुंबातील आहे. या मुलांना स्मार्टफोन घेणं परवडत नसल्याने ते ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत," असं सी. एच. श्रीवास्तव सांगतात.
-
या शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क हा सुद्धा मोठा कळीचा मुद्दा आहे. येथे अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कच येत नाही, असंही श्रीवास्तव सांगतात.
-
मी स्वत: पाच स्मार्टफोन विकत घेऊन ते माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करुन त्यांना शिक्षणसाठी दिलेत. सध्या श्रीवास्तव हमारा घर हमारा विद्यालय ही मोहीम राबवत अनेक गावांमध्ये मुलांच्या शिकवण्या घेत आहेत.
-
श्रीवास्तव यांच्या या चालत्या फिरत्या लायब्रेरीमधील पुस्तकं विद्यार्थ्यी तीन ते चार दिवस स्वत: जवळ ठेऊ शकतात. नंतर श्रीवास्तव ती या मुलांकडून घेण्यासाठी परत येतात.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक