-
पुतण्या तन्मय फडणवीस याने घेतलेल्या लसीमुळे देवेंद्र फडणवीस वादात अडकले आहेत. यावरून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तसंच ट्रोलही केलं जात आहे. तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपण दुसरा डोस घेतल्याचं त्याने म्हटलं होतं.
-
लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसनंही यावरून काही शंका उपस्थित केल्या असून, भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
-
सहव्याधी असलेल्या ४५ वर्षापुढील नागरिकांना लस मिळत नाहीये. पण ४५ तन्मय फडणवीसला मिळाली, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.
-
संपूर्ण देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असताना ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेला तन्मय फडणवीस लस घेतो कसा, असा सवाल लोक विचारू लागले आहेत.
-
आपल्याला देवेंद्र फडणवीस व तन्मय फडणवीस यांना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे केंद्र सरकारला आज १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा निर्णय घ्यावा लागला, असा टोलाही एका नेटकऱ्याने लगावला आहे.
-
एक मेपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे वाद सुरू झाला आहे.
-
तन्मय फडणवीस याने लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो काही वेळात डिलीटही केला होता.
-
माझे वडील ४५ वर्षापुढील असूनही त्यांना लस मिळाली नाही. कारण लस उपलब्ध नाही, असं म्हणत एका नेटकऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
-
'देवेंद्र फडणवीस तुमचा पुतण्या तन्मय फडणवीस हा ४५ वर्षांचा आहे का?, जर नसेल तर तो लसीकरणासाठी कसा काय पात्र ठरला?. रेमडेसिवीरप्रमाणे तुम्ही लसीचा साठा केला आणि तुमच्या कुटुंबियांना देत आहात का? लशीच्या तुटवड्यामुळे लोकांचे मृत्यू होत असताना फडणवीस कुटुंब मात्र सुरक्षित आहे," असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.
-
हे खरं असेल तर धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील लोकांना केंद्रातील भाजपा सरकाकडून लस देण्यास नकार दिला जात असताना फडणवीसांच्या पुतण्याने लस घेतली आहे, अशी टीकाही केली आहे.
-
टीका करण्याबरोबरच काहीजणांनी यावरून फडणवीसांना ट्रोलही केलं आहे. चित्रपटातील संवाद आणि दृश्य वापरून ट्रोल केलं जात आहे.
-
आपण तन्मय फडणवीसला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे केंद्र सरकारला १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण खुलं करावं लागलं, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.
-
तन्मय फडणवीस याने लस घेतानाचा फोटो पोस्ट केला. नंतर डिलीटही केला. मात्र त्याआधीच त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.
-
तन्मय फडणवीस विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या, तर माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे.
-
संपूर्ण देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असताना ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेला तन्मय फडणवीस लस घेतो कसा, असा सवाल लोक विचारू लागले आहेत.

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा