-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून पालिकेच्या निमित्ताने मोर्चेबांधणी सुरु असल्याची चर्चा आहे. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका पार पडत असून अनेक उद्घाटनाचे कार्यक्रमदेखील होत आहे. याशिवाय राज ठाकरे अनेक महत्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
मंगळवारी राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
ठाकरे घराण्याचे बाबासाहेब पुरंदरेंशी असलेले कौटुंबिक संबंध सर्वश्रुत आहेत. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
त्यामुळे राज ठाकरेंनी पुणे दौऱ्यात बाबासाहेब पुरंदरेंची सदिच्छा भेट घेतली.
-
मात्र या भेटीदरम्यान चर्चा रंगली ती म्हणजे राज ठाकरेंना घातलेल्या मास्कची.
-
अनेकदा जाहीरपण मी मास्क घालत नाही म्हणणारे राज ठाकरे मास्क घालून आल्याने आश्चर्य व्यक्त होत होतं.
-
बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत चर्चा सुरु असताना राज ठाकरे पूर्णवेळ मास्क घालून होते.
-
यामुळे मास्कला विरोध करणारे राज ठाकरे मास्कमध्ये दिसल्याने चर्चा रंगली होती.
-
राज ठाकरेंना याआधी अनेकदा विनामास्क पाहिलं गेलं आहे. (फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात जेव्हा राज्यातील करोनाचे रुग्ण वाढत होते, तेव्हा बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील राज ठाकरे मास्क न घालताच पोहोचले होते. (फोटो सौजन्य : राज ठाकरे / फेसबुक)
-
करोनामुळे सर्वांनाचा मास्कचा वापर करण्यास सांगितलं जात असून तुम्ही मास्क का लावला नाही असं पत्रकारांनी विचारलं असता राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की ,"याचं कारण म्हणजे सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही". (फोटो सौजन्य : राज ठाकरे / फेसबुक)
-
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे विनामास्क दिसले होते. (फोटो सौजन्य : राज ठाकरे / फेसबुक)
-
त्यावेळी पत्रकारांनी मास्क न घालण्याचं कारण विचारलं असता मी मास्क घालत नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं होतं. (फोटो सौजन्य : राज ठाकरे / फेसबुक)
-
राज ठाकरे मास्क का घालत नाहीत? याविषयी लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी यावर उत्तर दिलं होतं. "मध्यंतरी मला हाताच्या आणि पायाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात जावं लागलं तेव्हा मास्क लावला होता. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं. शिवाजी पार्कात मी पाहिलं तर अनेक लोक मास्क लावून धावत होते. मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका. कुठेतरी बेशुद्ध होऊन पडाल. त्यामुळे मास्क लावण्यास माझा विरोध आहे असं काही नाही", असं ते म्हणाले होते. (फोटो सौजन्य : राज ठाकरे / फेसबुक)

Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….