-
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक नुकताच पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरसोबत रोमँटिक अंदाजात दिसला.
-
आयशा उमरने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शोएबसोबतचा तिचा रोमँटिक आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.
-
शोएब आणि आयशाचे हे सिझलिंग फोटो सोशल मीडियावर तर व्हायरल होत आहेतच, पण हे फोटो पाहून चाहते सानिया मिर्झाला दूर राहण्याचा सल्लाही देत आहेत.
-
शोएब मलिक आणि आयशा उमरचे हे फोटो एका स्थानिक मासिकातील आहेत, जी गेल्या महिन्यातील आहेत. आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंडच्या विजयानंतर आयशाने काही फोटो शेअर केले आहेत.
-
याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सेमीफायनलच्या दिवशी आयशाने इंस्टाग्रामवर शोएब मलिकसोबत स्विमिंग पूलमधील काही छायाचित्रे शेअर केली होती. हे फोटो बघूनच चाहते सानिया मिर्झाला दुर राहण्याचा सल्ला देत आहेत.
-
शोएब मलिक आणि आयेशा उमरचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले असून चाहते त्याला सानिया मिर्झासोबत जोडत आहेत. पाकिस्तानच्या आवडत्या वहिनीने शोएब मलिकला इतके सिझलिंग आणि रोमँटिक फोटोशूट करण्याची परवानगी कशी दिली, असे चाहते सोशल मीडियावर विचारत आहेत.
-
आयशा उमर म्हणाली की, “कोणत्याही मुला-मुलीचे रोमँटिक फोटोशूट अफेअर दर्शवत नाही.” आयशाच्या शोएब मलिकसोबतच्या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने तिला विचारले की, तुमचा दोघांचा लग्नाचा विचार आहे का? यावर प्रतिक्रिया देताना आयशा म्हणाली की, “अजिबात नाही.”
-
आयशा उमर म्हणाली, “तो विवाहित आहे आणि आपल्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांबद्दल मला खूप आदर आहे. शोएब आणि मी एकमेकांचे चांगले मित्र आणि शुभचिंतक आहोत. या जगातही माणसांचे असे नाते असते.”
-
शोएब मलिकने टी -२० विश्वचषक २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकल्यानंतर आयेशा उमरने हे फोटो शेअर केले होते.
-
शोएब मलिक त्याच्या या शानदार खेळीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. विशेषत: त्याने १८ चेंडूत ५४ धावांच्या शानदार खेळीसह भारताच्या केएल राहुलला मागे टाकले आणि स्पर्धेतील सर्वात जलद ५० धावांचा विक्रम प्रस्थापित केला.
-
दुसरीकडे, आयशा उमरने अलीकडेच तिच्या लोकप्रिय सिटकॉम बुलबुलची अकरा वर्षे साजरी केली. दुबईतील फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईटमध्येही ती सहभागी झाली होती.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन दावा, आता म्हणे “भारत-पाकिस्तान एकमेकांवर…”