-
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार असल्याची चर्चा आहे. मुकेश अंबानी यांचे पुतणे जय अनमोल अंबानीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून जयने क्रिशा शाहसोबत साखरपुडा केल्याचे बोलले जात आहे. येत्या काही महिन्यांत ते लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत. जय अनमोल हा अनिल अंबानी आणि टीना मुनीम यांचा मोठा मुलगा आहे. चला जाणून घेऊया जयने ज्या मुलीशी साखरपुडा केल्याची चर्चा आहे त्या क्रिशा शाहविषयी..
-
क्रिशा शाह मुंबईत राहणाऱ्या तिच्या भावासोबत DYSCO नावाची संस्था चालवते. क्रिशाच्या भावाचे नाव मिशल शाह आहे.
-
क्रिशाची संस्था DYSCO ही सामाजिक कार्य करते. डिस्को हे एक प्रोफेशनल नेटवर्किंग अॅप आहे, जे लोकांना काम, करिअर आणि व्यवसायांचा दृष्टीकोन देण्यासाठी तयार करण्यात आलंय.
-
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सोशल पॉलिसी आणि डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन भारतात परतलेल्या क्रिशाने तिच्या भावाला भागीदार बनवले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
-
क्रिशाच्या बॅचलर डिग्रीबद्दल सांगायचे तर तिने कॅलिफोर्निया विद्यापीठातून पॉलिटिकल इकॉनॉमीचा कोर्स केला आहे.
-
क्रिशा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अंबानी कुटुंबातील जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जय अनमोलने क्रिशासोबत त्याच्या 30व्या वाढदिवसाला एंगेजमेंट केली होती.
-
मात्र, याबाबत अद्याप अंबानी कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
-
परंतु फोटो आणि चर्चांवरून अंबांनींच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजतील असं बोललं जातंय.
-
सर्व फोटो – DYSCO वरून साभार

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली