-
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच दुबई एक्स्पो २०२० च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
-
अमृता यांनी त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दुबई एक्स्पोमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी फोटो शेअर करताना अमृता यांनी थेट दुबईमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलंय.
-
अमृता यांनी या एक्स्पोमध्ये एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
अमृता यांच्यसोबत अभिनेता सुनिल शेट्टी, गायक शान यासारख्या सेलिब्रिटी या दुबई एक्स्पोला उपस्थित होते.
-
दुबई एक्स्पो २०२० च्या इंडियन पॅव्हेलियनला मी भेट दिली असं अमृता यांनी फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
-
अमृता या कॉर्परेट लूकमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.
-
या दुबई एक्स्पोमध्ये जगभरातील १९२ वेगवेगळ्या देशांनी सहभाग नोंदवला असल्याचंही अमृता यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
-
भारताच्या पॅव्हेलियनला तब्बल १५ लाख लोकांनी भेट दिल्याची माहिती अमृता यांनी फोटो शेअर करताना दिलीय.
-
भारताचे वेगवेगळे पैलू या प्रदर्शनामधून जगासमोर ठेवण्यात आल्याचं अमृता यांनी म्हटलं आहे.
-
भारतामधील मदिरांचे मिनिएचर या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.
-
भारतामधील पर्यटनासंदर्भात माहिती देण्यासाठी या प्रतिकृती उभारण्यात आल्यात.
-
भारताची संस्कृती, शक्ती या प्रदर्शनामधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं अमृता यांनी म्हटलंय.
-
अमृता यांनी तेथील अधिकाऱ्यांकडून प्रदर्शनासंदर्भात सविस्तर माहिती करुन घेतली.
-
अमृता यांनी यावेळेस येथील वेगवेळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी पर्यावरणासंदर्भातील विषयाबरोबरच भारताच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल चर्चा केली.
-
अमृता यांनी यावेळी सविस्तर माहितीही जाणून घेतली.
-
या दुबई एक्स्पो २०२० च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ओन्ली वन अर्थ या कार्यक्रमात अमृता सहभागी झाल्या होत्या.
-
या कार्यक्रमात अमृता यांनी आपली मत मांडली आणि पर्यावरण संवर्धनासंदर्भात भाष्य केलं.
-
यावेळी अमृता यांच्या हस्ते पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
आपण विकास आणि निसर्ग संवर्धन यामधील समतोल राखला पाहिजे असं अमृता यांनी यावेळी म्हटलं.
-
आपण सर्वांनीच पर्यावरणपुरक जीवनसरणीचा अवलंब केला पाहिजे असं अमृता यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं.
-
अमृता यांचा कॉर्परेट लूक सोशल मीडियावर अनेकांना फारच आवडल्याचं कमेंट सेक्शनमधून दिसत आहे.
-
या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाइन माध्यमातून भाषण दिलं.
-
भारत आणि दुबईमधील अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
अमृता यांच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट करुन त्यांचं अभिनंदन केल्याचं फेसबुकवर दिसत आहे.
-
या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांसोहबतचे फोटोही अमृता यांनी शेअर केलेत.
-
दुबईमधील भारताच्या पॅव्हेलियनला भेट दिल्यानंतर अमृता यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
-
मोदींच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मोदी है तो मुमकिन है,‘ या वाक्याचा वापर अमृता यांनी पोस्टमध्ये केलाय.
-
भारत सर्व आघाड्यांवर कशापद्धतीने काम करतोय हे या प्रदर्शनातून पहायला मिळालं. खरोखरच ‘मोदी है तो मुमकिन है,‘ असं अमृता यांनी म्हटलंय.
-
हीच ती पोस्ट ज्यामध्ये अमृता यांनी दुबईमधून पंतप्रधान मोदींचं आणि केंद्र सरकारचं कौतुक केलंय. (सर्व फोटो अमृता फडणवीस यांच्या फेसबुकवरुन साभार)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक