-
सही म्हणजेच स्वाक्षरी ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. आपली स्वाक्षरी ही हटके आणि इतरांना कॉपी करता येणार नाही अशी असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर अशा एका सहीची चर्चा आहे जी जगात कदाचितच कोणाला कॉपी करता येईल.
-
हीच ती सही आहे तिची सध्या इंटरनेटवर तुफान चर्चा असून अनेकांना ही सही आहे की साळींदराचं चित्र असा प्रश्न पडलाय. गुवहाटीमधील एका मेडिकल कॉलेमधील अधिकाऱ्याची ही सही असल्याचं स्टॅम्पवरुन स्पष्ट होतंय. काहींनी याला जगातील सर्वात कठीण सहीसुद्धा म्हटलंय.
-
किती ओळखी काढल्यात हे सही करणाऱ्याला कसं कळत असेल, अशा प्रश्न एकाला ही सही पाहून पडलाय. अशाच अनेक मजेदार कमेंट या सहीच्या ट्विटवर आल्यात त्याच आपण पाहुयात…
-
हा सारा संवाद फारच मजेदार आहे असं एकाने म्हटलंय. आणि खरोखरच त्यावरील प्रतिक्रिया तशाच आहेत.
-
माझ्या सहीत दोन व्हायमध्ये फरक असला तरी स्वीकारत नाहीत, असं एकाचं म्हणणंय.
-
सही पाहता त्यामधून झाडूचा भास होत असल्याने एकाने हा नक्कीच आपचा समर्थक असल्याचं म्हटलंय.
-
हा नक्कीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याने त्याची सही अशी असल्याचा शोध एकाने लावलाय.
-
कालच मी याबद्दल बोलत होते आणि आज मी ही सही पाहिली, असं एक मुलगी सांगतेय.
-
त्याला चित्रकार व्हायचं होतं पण पालकांमुळे तो डॉक्टर झालाय, असं एखीने म्हटलंय.
-
ही सही आहे की अंगठ्याचा ठसा असा प्रश्न एकाला पडलाय.
-
भारतीय बँकांमध्ये जाण्यासाठी शुभेच्छा…
-
हा सही करणारा सेलिब्रिटी झालं तर कठीण आहे असं एकाचं म्हणणं आहे.
-
त्याच्या बँक खात्याचं देव भलं करो, असं एकीने म्हटलंय.
-
या सहीसाठी किती शाई खर्च होत असेल असा प्रश्न एकाला पडलाय.
-
सही करणाऱ्याच्या मुलांना ही कॉपी करता येणार नाही म्हणून एकाला वाईट वाटलंय.
-
ही जगातील सर्वोत्तम स्वाक्षरी असल्याचं एकाने म्हटलंय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Video: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी केला गंभीर आरोप