-
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून आपल्या घरी परतले आहेत. त्यानंतर त्यांनी आपण स्वतःची सुटका करून गुवाहाटीवरून पळून आलो, असा दावा केला होता.
-
मात्र, त्यांचा हा दावा खोटा असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला आहे. त्यासाठी त्यांनी काही फोटो देखील सादर केले आहेत.
-
नितीन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवल्याचा दावा शिंदे गटांनी केला आहे.
-
देशमुख यांना गुवाहाटी येथून विशेष विमानाने नागपूरला सोडण्यात आले.
-
आपली पत्नी आजारी आहे, मुलांना भेटायचं आहे, अशी कौटुंबीक कारणं दिल्याने त्यांना घरी पाठवण्याची तात्काळ व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली, असंही शिंदे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
-
जबरदस्तीने ताब्यात ठेवले असते, तर आमदार नितीन देशमुख यांस परतीच्या प्रवासासाठी तातडीने विशेष विमानाची व्यवस्था केली नसती.
-
गुवाहाटी ते नागपूर या प्रवासात आमदार नितीन देशमुख यांच्या समवेत त्यांचे मित्र आणि नातेवाईक प्रमोद देशमुख, महादेव गवळे आणि दिलीप बोचे होते.
-
अतिशय खेळी-मेळीच्या वातावरणात त्यांना परत सोडण्यात आले.
-
ठाण्यातील पदाधिकारी शरद कणसे आणि जेरी डेव्हिड यांनी आमदार नितीन देशमुख यांना नागपूर येथे सुखरूप पोहोचवलं, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…