-
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.
-
अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे.
-
नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले आहे. यासंबंधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत.
-
मात्र या मागणीच्या निमित्ताने नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे.
-
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधींजींनी दिलेल्या योगदानाबद्दल भारतातील जवळजवळ सर्वच नोटांवर आज त्यांचा फोटो दिसून येतो.
-
आज देशातील सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो दिसून येतो. मात्र महात्मा गांधींचा फोटो भारताच्या चलनी नोटेवर सर्वात आधी कधी छापण्यात आला तुम्हाला ठाऊक आहे का?
-
तसेच आज आपल्याला दिवसातून नोटांवर अनेकदा दिसणारा महात्मा गांधींचा नोटेवरील हा फोटो कोणी? कधी? आणि कसा काढला होता यासंदर्भातही अनेकांनी माहिती नसते.
-
महात्मा गांधींचा फोटो भारतीय चलनावर सर्वात आदी जवळजवळ ५० वर्षांपूर्वी छापण्यात आला.
-
महात्मा गांधींच्या जन्म शताब्दीनिमित्त पहिल्यांदा नोटेवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला होता.
-
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन भारतीय चलनावर असणाऱ्या ब्रिटीशांच्या किंग जॉर्जचा फोटो काढून त्या जागी महात्मा गांधींचा फोटो लावण्याचा विचार करण्यात आला.
-
गांधीजींचा फोटो लावण्यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी तेव्हा नव्यानेच स्थापन झालेल्या सरकारला थोडा वेळ हवा होता.
-
त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून किंग जॉर्जऐवजी नोटांवर सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहांचा फोटो लावण्यात आला.
-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महात्मा गांधींचा फोटो असणारी पहिली नोट कोमेमोरेटीव्ह म्हणजेच स्मरणार्थ छापण्यात येणारी नोट म्हणून १०० रुपयांची नोट १९६९ साली छापली.
-
१९६९ हे गांधीजींचे जन्म शताब्दी वर्ष होतं. तसेच नोटेवर छापण्यात आलेल्या फोटोमध्ये सेवाग्राम आश्रमही होतं.
-
सध्या गांधीजींचा फोटो असणाऱ्या ज्या नोटा आपण वापरतो त्या सर्वात आधी १९८७ साली छापण्यात आल्या.
-
आज नोटांवर दिसणारी गांधीजींची मुद्रा आहे ती सर्वात आधी ५०० रुपयांच्या नोटांवर ऑक्टोबर १९८७ रोजी छापण्यात आली. त्यानंतर हाच फोटो इतर चलनी नोटांवरही वापरण्यात आला.
-
रिझर्व्ह बँकेने १९९६ साली नोटेमध्ये आणखीन काही वैशिष्ट्यांचा समावेश केला.
-
महात्मा गांधी यांचा फोटो असणाऱ्या नोटा अधिक अद्यावत करण्यात आल्या. या नव्या नोटांमध्ये वॉटरमार्क बदलण्यात आला होता.
-
विंडोड सिक्युरिटी थ्रेड वापरण्यात आलेला. लेंटेंट इमेज आणि अंध व्यक्तींसाठी इंटेग्लियो यासारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या या नोटा होत्या.
-
१९९६ च्या आधीच्या १९८७ साली छापण्यात आलेल्या नोटांमध्ये महात्मा गांधीचा फोटो वॉटरमार्क म्हणून वापरण्यात यायचा. नंतर सर्वच नोटांवर गांधीजींचा फोटो छापला जाऊ लागला.
-
१९९६ साली महात्मा गांधीचा फोटो असणाऱ्या ५,१०,२०,१००,५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनात आल्या.
-
या नोटांवर अशोक स्तंभाच्या जागी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो आणि डाव्या बाजूला अशोक स्तंभ अशी रचना करण्यात आली होती.
-
१९९६ साली महात्मा गांधीचा फोटो असणाऱ्या ५,१०,२०,१००,५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनात आल्या.
-
महात्मा गांधीचा सध्या चलनी नोटांवर दिसणारा फोटो १९४६ साली काढण्यात आला होता.
-
आज जवळजवळ सर्वच नोटांवर दिसणारा महात्मा गांधांचा हा फोटो व्हॉइसरॉय हाऊसमध्ये (आता राष्ट्रपती भवन) १९४६ साली काढण्यात आला होता.
-
महात्मा गांधी म्यानमार (तेव्हा बर्मा) आणि भारतामध्ये ब्रिटीश सेक्रेटरी म्हणून कार्यरत असणाऱ्या फ्रेडरिक पेथिक लॉरेंन्स यांना भेटण्यासाठी गेले होते. याचवेळी तेथे काढण्यात आलेल्या महात्मा गांधीच्या फोटोचा वापर नोटांवर करण्यात आला आहे.
-
मात्र आज नोटांवर वापरला जाणार गांधीजींचा हा फोटो नक्की कोणत्या छायाचित्रकाराने काढला यासंदर्भातील माहिती उपलब्ध नाही.
-
गांधीजींचा फोटो असणाऱ्या नोटा आधी वेगवेगळ्या रचनेनुसार छापण्यात यायच्या.
-
१९४९ साली तत्कालीन सरकारने अशोक स्तंभाच्या नव्या रचनेसहीत एक रुपयाची नोट चलनात आणली.
-
१९५३ पासून हिंदीमध्ये नोटांवर मजकूर छापण्यास सुरुवात झाली.
-
१९५४ साली एक हजाराबरोबरच पाच हजार आणि दहा हजाराच्या नोटा नव्याने छापण्यात आला. एक हजाराच्या नोटेवर तंजोर मंदिराची डिझाइन होती.
-
पाच हजाराच्या नोटेवर गेट वे ऑफ इंडियाचा फोटो होतो तर दहा हजाराच्या नोटेवर अशोक स्तंभ छापण्यात आला होता.
-
एक, पाच आणि दहा हजाराच्या या नोटा १९७८ साली चलनातून हद्दपार करण्यात आल्या.
-
१९८० साली नोटा छापण्यासाठी नवीन सेट तयार करण्यात आले. तेच आता वापरले जातात.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक