-
जगात वेगवेगळ्या पद्धतीची हॉटेल्स आपण पाहिलीच असतील. जगात अशी अनेक अनोखी हॉटेल्स आहेत, जी त्यांच्या विचित्र डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहेत.
-
विशेष म्हणजे सोन्याने तयार करण्यात आलेले एक हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये आहे.
-
तुम्हाला खरं तर ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु येथील प्रत्येक वस्तूवर सोन्याची झळाळी पाहायला मिळते.
-
होय, मग तुम्ही हॉटेलच्या खोलीकडे पाहा, खाली पडलेल्या फरशा पाहा किंवा टॉयलेट सीट पाहा. येथे सगळ्यावर सोन्याचा मुलामा चढवलेला दिसेल.
-
२५ मजले असलेले हे सुंदर पंचतारांकित हॉटेल ४०० खोल्यांनी बांधले गेले आहे. या हॉटेलच्या भिंतींवर ५४,००० स्क्वेअर फुटामध्ये सोन्याचा मुलामा असलेल्या टाइल्स आहेत.
-
विशेष म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड लाल आणि सोनेरी आहे.
-
इथल्या खोल्यांमधील फर्निचर आणि सामान देखील सोन्याच्या थराने मढवलेले आहे.
-
येथील बाथरूम, सिंक, शॉवर हे सर्व सोन्याचे आहेत. या हॉटेलच्या छतावर एक इन्फिनिटी पूल देखील बांधण्यात आला आहे.
-
हे हॉटेल २००९ मध्ये बांधण्यात आले होते. खरं तर सोने हे मानसिक तणाव दूर करत असल्याचं सांगितलं जातं.. त्यामुळे ते सोन्याचे बनलेले आहे.
-
येथील खोल्यांची सुरुवात सुमारे २० हजार रुपये भाड्याने होते. त्याच वेळी डबल बेडरूम सूटमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे ७५ हजार रुपये आहे.
-
या हॉटेलमध्ये ६ खोल्यांचे प्रकार आणि ६ सूट आहेत. प्रेसिडेंशियल स्वीटची किंमत प्रति रात्र ४.८५ लाख रुपये आहे.
-
हॉटेलमध्ये एक गेमिंग क्लबदेखील आहे, जो २४ तास खुला असतो.
-
कॅसिनो आणि पोकरसारखे खेळही येथे खेळले जातात. या खेळात तुम्ही जिंकून पैसेही कमावू शकता.
