-
पक्षाचा निवडणूक खर्च, राजकीय पक्षांना मिळणारा निधी, गुन्हेगारी इतिहास आणि नेत्यांची मालमत्ता यावर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) एक अहवाल जारी केला आहे.
-
एडीआरच्या अहवालानुसार देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत.
-
मुख्यमंत्र्यांच्या एकूण घोषित संपत्तीच्या आधारे एडीआरने हा अहवाल जारी केला आहे. देशभरातील मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ३३.९६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
-
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत.
-
सर्वाधिक संपत्ती असलेल्या पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू आणि ओडिशाचे नवीन पटनायक यांचा समावेश आहे.
-
ADR नुसार जगन मोहन यांच्याकडे ५१० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
-
अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे १६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
-
तर सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक असून त्यांची संपत्ती ६३ कोटी रुपयांहून अधिक आहे.
-
एडीआरच्या अहवालानुसार, देशातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती १० कोटी ते ५० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर १८ मुख्यमंत्र्यांची संपत्ती एक कोटी ते १० कोटींच्या दरम्यान आहे. केवळ एका मुख्यमंत्र्यांची संपत्ती 1 कोटींपेक्षा कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
-
सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती १५ लाख ३८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
-
सर्वाधिक कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे आहे. त्यांची एकूण संपत्ती १ कोटी १८ लाख इतकी आहे.

Today Horoscope live updates: शनीच्या साडेसातीपासून ५ राशींना मिळणार सुटका, कोणाला बक्कळ धनलाभ तर कोणाच्या कुंडलीत मोठे बदल; वाचा राशिभविष्य