-
Braj Holi 2024 : रंगाच सण होळीसाठी सारा देश सज्ज होत झाला आहे. दरम्यान बरसाना आणि नंदगाव या जुळ्या शहरांमध्ये लाठमार होळीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी अनुक्रमे राधा आणि भगवान कृष्णाची नगरे म्हणून ओळखली जातात.
-
होळीच्या काही दिवस आधी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात दरवर्षी लाठमार होळी साजरी केली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक या शहरांना भेट देऊन उत्सव साजरा करतात. सहसा, उत्सव एका आठवड्यापेक्षा जास्त काळ साजरा केला जातो आणि रंगपंचमीला या खेळाची सांगता होते.
-
यावर्षी, होळी २५ मार्च रोजी साजरी केली जाईल. हिंदू चंद्र महिन्याच्या फाल्गुनच्या पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये, हा सण सामान्यतः फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये येतो.
-
हा सण केवळ वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवत नाही तर राधा आणि भगवान कृष्ण यांच्या दैवी प्रेमाचाही उत्सव साजरा करतो.
-
येथे काही फोटो आहेत. पहा आणि आनंद घ्या! . (पीटीआय फोटो)
-
मथुराजवळील बरसाना येथे बरसाना येथील महिलांनी लठ्ठमार होळीच्या उत्सवादरम्यान नांदगावमधील पुरुषांना लाठीने मारण्याची प्रथा साजरी केली. (पीटीआय फोटो)
-
मथुराजवळील बरसाना येथील श्री जी मंदिरात लठ्ठमार होळी उत्सवादरम्यान भक्त. (पीटीआय फोटो)
-
लठ्ठमार होळी दरम्यान गुलालच्या रंगामध्ये रंगलेले लोक (पीटीआय फोटो)
-
मथुरा मध्ये भक्तांनी लठ्ठमार होळीमध्ये सहभागी होण्याचा पुरपुर आनंद घेतला. . (पीटीआय फोटो)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक