-
भारतीय लष्करातील शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती सिंह सध्या चर्चेत आहे. स्मृती सिंह यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्र देण्यात आले, त्यानंतर सोशल मीडियावर तिने सासरच्या घरून सर्व काही घेऊन आपल्या माहेरी गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. (पीटीआय फोटो)
-
अंशुमनच्या आई वडिलांच्या मुलाखती नंतर सोशल मीडियावर स्मृती सिंहविरोधात ट्रोल होऊ लागले. मात्र, यादरम्यान सोशल मीडियावर आणखी एका महिलेला स्मृती सिंह समजत शिव्याशाप आणि ट्रोल करण्यास सुरुवात झाली.(रेश्मा सेबॅस्टियन/इन्स्टाग्राम)
-
या महिले बद्दल बोलायचे झाले तर ही केरळची प्रसिद्ध फॅशन एन्फ्लुएन्सर आहे. तिचे नाव रेश्मा सेबॅस्टियन असून तिला एका शहीद जवानाची पत्नी मानून ट्रोल केलं जात आहे. स्मृती सिंग आणि रेश्मा सेबॅस्टियन यांचा चेहरा सारखा असून त्या दिसायलाही खूप साम्य आहेत. मात्र ट्रोल करणाऱ्यांना रेश्माने चोख उत्तर दिले.
-
तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना रेश्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे स्मृती सिंग म्हणजे भारतीय लष्करातील कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या विधवा यांचे पेज किंवा अकाऊंट नाही. पहिले प्रोफाइलचे बायो वाचा आणि कृपया चुकीची माहिती आणि द्वेष पसरवणे टाळा. ” (रेश्मा सेबॅस्टियन/इन्स्टाग्राम)
-
पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुढे तिने लिहिले की, प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. याशिवाय रेश्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती तिला लष्करी अधिकाऱ्याची पत्नी म्हणत एका फेसबुक पोस्टमध्ये तिच्यावर टीका करत आहे. (रेश्मा सेबॅस्टियन/इन्स्टाग्राम)
-
पोस्ट शेअर तिनेहे ही सांगितले की, “जे लोक मला शहीद कॅप्टन अंशुमनची पत्नी समझून सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत, हा खरंच मूर्खपणा आहे! स्मृती सिंगबद्दल चुकीची माहिती पसरवण्यासाठी माझ्या ओळखीचा वापर केला जात आहे. आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत.” (रेश्मा सेबॅस्टियन/इन्स्टाग्राम)
-
एन्फ्लुएन्सर असण्यासोबतच, रेश्मा एक अभियंता आणि व्यवसायाने मॉडेल देखील आहे. ती तिच्या पती आणि मुलीसोबत जर्मनीत राहते. रेश्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. रेश्माचे इंस्टाग्रामवर ३४९ हजार फॉलोअर्स आहेत. २०१ पासून ती मॉडेलिंग करत आहे. (रेश्मा सेबॅस्टियन/इन्स्टाग्राम)
-
स्मृती सिंह यांच्याबद्दल सांगायचे तर, १९ जुलै २०२३ रोजी सियाचीनमध्ये भारतीय लष्कराच्या दारूगोळा भांडारात आग लागली होती. कॅप्टन अंशुमनने आपल्या सहकारी सैनिकांचे प्राण वाचवताना सर्वोच्च बलिदान दिले. यानंतर, यावर्षी ६ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ती चक्र देऊन सन्मानित केले. (पीटीआय फोटो)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार