-
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुमुल्य योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज १०५ वी पुण्यतिथी आहे. (संग्रहित फोटो)
-
२३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातल्या रत्नागिरीमध्ये टिळकांचा जन्म झाला. ते शिक्षक, वकील, पत्रकार होते. (संग्रहित फोटो)
-
टिळक हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या पहिल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. (संग्रहित फोटो)
-
लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या लेखणीमधून ब्रिटीश सरकारला आव्हान दिलं. (संग्रहित फोटो)
-
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेने ते आपल्या सर्वामध्ये परिचित आहेत. (संग्रहित फोटो)
-
आजच्या दिवशी (१ ऑगस्ट) १९२० साली लोकमान्य टिळक यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, त्यांना लोकमान्य ही उपाधी जनतेनेच दिली. (संग्रहित फोटो)
-
कारण केसरी, मराठी या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध जनमत तीव्र करण्याचे काम केले. (संग्रहित फोटो)
-
गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक सणांमधून त्यांनी जनतेमध्ये एकता निर्माण केली. (संग्रहित फोटो)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक