-
रक्षाबंधन २०२५ या वर्षी एक खास योग जुळून येत आहे. जिथे बहीण-भावाच्या प्रेमाचा सण साजरा केला जातो, तिथेच ग्रहांच्या हालचालींमध्ये मोठा बदल होणार आहे.
-
९ ऑगस्टच्या दिवशी, ज्याच दिवशी रक्षाबंधन आहे, व्यापार, वाणी आणि बुद्धीचे कारक बुध ग्रह उदयाला येणार आहेत.
-
ज्याचा थेट परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी काही निवडक राशींसाठी हा काळ अक्षरशः ‘लॉटरी’सारखा ठरणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी पाहूयात…
-
बुध ग्रहाच्या उदयाने कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैसे कमविण्याच्या संधी मिळू शकतात. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते. या राशीच्या मंडळींचे दांपत्य जीवन सुखी राहील.
-
बुध ग्रहाच्या उदयाने कन्या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नात वाढ, नवीन आर्थिक संधी, शेअर बाजार किंवा सट्ट्यामुळे नफा, आणि करिअरमध्ये सन्मानासह प्रगती मिळण्याची शक्यता आहे. ज्या योजना आजवर रखडल्या होत्या, त्यात अचानक यश मिळू शकतं. आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी नशिबाचे दार ठोठावतील. नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे.
-
बुध ग्रहाच्या उदयाने तूळ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठे ऑर्डर्स, नवे डील्स मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा फार चांगली असू शकते. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
-
या राशींच्या लोकांनी ९ ऑगस्टपासून आपल्या आयुष्यात येणाऱ्या या चमत्कारांना ओळखून योग्य निर्णय घ्यावेत. ग्रहांची कृपा मिळाली तर कोणतंही स्वप्न अशक्य राहत नाही…
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“गुजरातचे गृहमंत्री असताना तुम्हाला अटक झालेली”, काँग्रेस खासदाराने कोंडीत पकडताच अमित शाह म्हणाले…