-
Raksha Bandhan 2025 Best Gifts for Sisters and Brothers : रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावंडांसाठी तुम्ही खरेदी करू शकता अशा काही टॉप रक्षाबंधन गिभ्ट्सची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. रक्षाबंधन २०२५ (Raksha Bandhan 2025) जवळ येत असताना, लोकप्रिय भेटवस्तू देण्यासाठी हा एक आदर्श क्षण आहे. परंतु, आपल्या बहिणीला किंवा भावाला रक्षाबंधनाच्या दिवशी कोणती भेटवस्तू द्यायची सुचत नसेल तर आम्ही तुम्हाला काही चांगले पर्याय सुचवत आहोत. (PC : Pixabay)
-
टेक गॅझेट्स
वायरलेस इअरबड्स, स्मार्टवॉच, पोर्टेबल स्पीकर्स, स्मार्ट रिंग्ज किंवा यूएसबी चार्जरसह डेस्क लॅम्प यांसारख्या ट्रेंडी आणि व्यावहारिक भेटवस्तू या सणासुदीच्या हंगामासाठी सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. या भेटवस्तू तुमच्या भावंडांना जवळजवळ दररोज वापरता येतील. (PC : Pixabay) -
घरगुती भेटवस्तू
जर तुम्हाला हस्तकला किंवा बेकिंग आवडत असेल, तर तुम्ही स्वतः काही छान गोष्टी बनवण्याचा विचार करू शकता. हाताने बनवलेले कार्ड, छायाचित्रांनी भरलेले स्क्रॅपबूक किंवा घरगुती ब्राउनीजचा एक डबा देखील उत्कृष्ट भेटवस्तू ठरू शकतो. (PC : Pixabay) -
हॅम्पर्स
जर तुम्हाला तुमच्या भावंडांना त्यांच्या सेल्फ केअरमध्ये मदत करायची असेल तर तुम्ही त्वचेची काळजी घेणारी उत्पादने, हर्बल टी, फेस मास्क आणि इतर सेल्फ केअर वस्तूंनी भरलेले हॅम्पर्स गिफ्ट करू शकता. (PC : The Financial Express) -
पर्यावरणपूरक भेटवस्तू
स्टेशनरी हॅम्पर्स किंवा बांबूपासून बनवलेल्या गृहसजावटीच्या वस्तू यावर्षीच्या काही सर्वोत्तम पर्यावरणपूरक भेटवस्तू आहेत. सुंदर, पर्यावरणपूरक आणि अद्वितीय असण्यासोबतच या भेटवस्तू तुमच्या भावंडांना आवडतील अशा आहेत. (PC : The Financial Express) -
फिटनेस प्रेमींसाठी भेटवस्तू
या सणासुदीच्या काळात फिटनेस-आधारित भेटवस्तूंसाठी फिटनेस बँड, पोश्चर करेक्टर किंवा स्मार्ट वॉटर बॉटल हे काही सर्वोत्तम पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या भावंडांसाठी मेडिटेशन किंवा योग वर्गांचे वेलनेस सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकता.(PC : The Financial Express) -
स्टायलिश भेटवस्तू
वैयक्तिकृत कीचेन, सुंदर कुर्ता, टी-शर्ट, स्मार्ट वॉलेट किंवा एखादी स्टायलिश बॅग भेटवस्तूसाठी एक उत्तम पर्याय असू शकते. तुमच्या भावंडांच्या आवडीनुसार तुम्ही घड्याळे, सनग्लासेस किंवा ट्रेंडी दागिने यासारख्या अॅक्सेसरीजचा देखील विचार करू शकता. (PC : The Financial Express)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली