-
बार्कलेजच्या सहकार्याने ‘हुरून इंडिया’ने भारतातील धनिकांची यादी तयार केली आहे. त्यानुसार अंबानी कुटुंब सर्वाधिक श्रीमंत कुटुंब ठरले असून त्यांच्याकडे २८.२ लाख कोटींची संपत्ती आहे.
-
गेल्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या संपत्तीत १० टक्क्यांनी वाढ झाली आणि देशातील सर्वात धनवान उद्योगघराणे म्हणून त्याने स्थान टिकवून ठेवले, असे बार्कलेजच्या सहकार्याने ‘हुरून इंडिया’ने तयार केलेल्या अहवालाने नमूद केले.
-
भारताच्या जीडीपीमधील १२ व्या भागाइतकी अंबानी कुटुंबाची संपत्ती असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. तसेच भारतातील अब्जाधीशांकडे भारताच्या जीडीपीमधील ३६ टक्के एवढी संपत्ती आहे.
-
अंबानी कुटुंबानंतर कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबाचा द्वीतीय क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती ६.५ लाख कोटी इतकी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात १.१ लाख कोटींची वाढ झाली आहे. बिर्ला कुटुंब सिमेंट, मेटल, टेलिकॉम आणि वित्तीय सेवा यासारख्या व्यवसायात गुंतलेले आहे.
-
जिंदाल कुटुंबियांचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो. सज्जन जिंदाल नेतृत्व करत असलेल्या जेएसडब्लू स्टील या कंपनीच्या सहाय्याने जिंदाल कुटुंबियांकडे ५.७ लाख कोटींची संपत्ती आहे. ज्यात नुकतीच १ लाख कोटींची वाढ झाली.
-
अंबानी, कुमार मंगलम बिर्ला आणि जिंदाल यांच्याकडे मिळून तब्बल ४९.४ लाख कोटींची संपत्ती आहे. फिलिपन्सच्या जीडीपी एवढी या तीन कुटुंबाची संपत्ती आहे. यावरून त्यांच्या व्यवसायाचा विस्तार लक्षात येऊ शकतो.
-
बजाज कुटुंबाचा या यादीत चौथा क्रमांक आहे. त्यांच्याकडे ५.६४ लाख कोटींची संपत्ती आहे. बजाज कुटुंबाची संपत्ती २१ टक्क्यांनी घसरली आहे.
-
बजाज यांच्यानंतर पाचव्या स्थानावर आहे महिंद्रा कुटुंबिय त्यांच्याकडे ५.४३ लाख कोटींची संपत्ती आहे. महिंद्र कुटुंबाच्या शेअरमध्ये ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-
सहाव्या स्थानावर असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या नादर कुटुंबियांकडे ४.६८ लाख कोटींची संपत्ती आहे.
-
सातव्या स्थानावर मुरुगप्पा कुटुंब आहे. त्यांच्याकडे २.९२ लाख कोटींची संपत्ती आहे. तर आठव्या स्थानावर अझीम प्रेमजी कुटुंब आहे. अझीम प्रेमजी यांच्या विप्रोकडे २.७८ लाखांची संपत्ती आहे.
-
अनिल अग्रवाल यांनी पहिल्यांदाच नवव्या स्थानावर मजल मारली आहे. अग्रवाल कुटुंबाच्या हिंदूस्तान झिंककडे २.६ लाख कोटींची संपत्ती आहे. तर दहाव्या स्थानावर एशियन पेंट्सच्या दानी, चोक्सी आणि वकील कुटुंबियांचा समावेश आहे.

“कृपया…” पुणेकरांचा विषय हार्ड! आता D-Mart मध्ये लावली अशी पाटी की, वाचून तुम्हीही पोट धरून हसाल