-
शनीची साडेसाती ही एक अशी खगोलशास्त्रीय घटना आहे, जी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवते.
-
आयुष्याची दिशा, नशीब, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंध या सर्वांची या काळात उलथापालथ होऊ शकते आणि आता हीच साडेसाती पुन्हा एकदा सुरू होण्याच्या तयारीत आहे आणि यावेळी तिचा फटका बसणार आहे एका अत्यंत स्थिर पण संवेदनशील राशीवर.
-
सध्या शनी मीन राशीत स्थिर आहे आणि ३ जून २०२७ पर्यंत तिथेच राहणार आहे. पण, त्या दिवसानंतर शनी मेष राशीत प्रवेश करेल आणि या एका हालचालीने एका राशीच्या जीवनात वादळासारखा काळ सुरू होईल शनीची साडेसाती.
-
साडेसाती सुरू झाल्यानंतर संबंधित राशीच्या व्यक्तींनी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या काळात एखादी योजना यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.
-
प्रत्येक गोष्ट अडचणीत येऊ शकते. कामात अडथळे, घरात मतभेद, आरोग्याच्या समस्या आणि नात्यांमध्ये तणाव – या सर्व संकटांना तोंड द्यावं लागू शकतं.
-
नोकरी किंवा व्यवसायात अस्थिरता जाणवेल, अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात नकारात्मक विचार, मानसिक थकवा आणि आत्मविश्वास गमावणं हे सगळं तुमचं पाऊल मागे खेचू शकतं. (Photo-AI Generated)
-
शनीची साडेसाती सुरू झाल्यावर या राशीच्या लोकांना आपल्या संयमाची आणि सहनशक्तीची कसोटी द्यावी लागणार आहे. कामामध्ये यश मिळवणं कठीण होईल.
-
अडथळ्यांचा सामना वारंवार करावा लागेल. घरात आणि नात्यांत वादविवाद वाढू शकतात. विशेषतः बोलताना अतिशय काळजी घेणं गरजेचं असेल, अन्यथा जवळच्या व्यक्तींशी संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
-
विशेष म्हणजे ८ ऑगस्ट २०२९ ते ३१ मे २०३२ या काळात ही साडेसाती आपल्या सर्वाधिक प्रभावशाली, म्हणजेच सर्वात जास्त त्रासदायक टप्प्यावर असेल. यालाच साडेसातीचा ‘दुसरा टप्पा’ म्हणतात, जो बहुधा अत्यंत कष्टदायक आणि निर्णायक असतो.
-
ती रास आहे – वृषभ (Taurus). २०२७ मध्ये जसं शनी मेष राशीत प्रवेश करेल, तसं वृषभ राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल… आणि तिथून सुरू होईल या राशीच्या जीवनात संघर्ष, बदल आणि संयमाची परीक्षा…
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो सौजन्य: Freepik\Pexels)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’