-
कॅमेऱ्यांचा इतिहास:
कॅमेऱ्यांचा इतिहास पाहिला असता, त्यात आपल्याला मानवाच्या विविध क्षण टिपण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसेल. प्रत्येक युगात लागलेले अभूतपूर्व शोध आपली जग पाहण्याची आणि ते जतन करण्याबाबतची दृष्टी बदलतात. (फ्रीपिक) -
कॅमेरा ऑब्स्क्युरा (इ.स.पूर्व ५ वे शतक – इ.स. १६ वे शतक)
साध्या पिनहोल पेट्या किंवा अंधाऱ्या खोलीत प्रतिमा उलट्या प्रक्षिप्त होत होत्या. जरी ते साधन फोटो कॅप्चर करू शकत नसले तरी ते कलाकार आणि शास्त्रज्ञांसाठी महत्वाचे होते. छायाचित्रणाचा पाया तेथेच रुजला. -
डॅग्युरिओटाइप कॅमेरे (१८३९)
तपशीलवार अन् अद्वितीय अशा प्रतिमा तयार केल्या. मात्र, एक्स्पोजरला काही मिनिटे लागत असल्यामुळे त्या त्या विषयांसंबंधीच्या साधनाला पूर्णपणे स्थिर ठेवावे लागे किंवा व्यक्तीला स्थिर बसावे लागे. -
बॉक्स आणि फोल्डिंग कॅमेरे (१९ व्या शतकाचा उत्तरार्ध – २० व्या शतकाची सुरुवात)
‘कोडॅक’ कंपनीने “तुम्ही बटण दाबा, बाकीचे आम्ही करतो” या घोषणेसह फोटोग्राफी सर्वसामान्यांसाठी मग त्यामुळे कॅमेऱ्याचा वापर करणे लोकप्रिय छंद बनला. -
३५ मिमी फिल्म कॅमेरे (१९२० – १९८०)
कॉम्पॅक्ट व विश्वासार्ह ३५ मिमी फिल्म कॅमेरा उद्योग मानक झाला. ‘निकॉन’ व ‘कॅनन’ या कंपन्यांनी हा फॉरमॅट जगभर लोकप्रिय केला. त्यामुले व्यावसायिक आणि दैनंदिन फोटोग्राफीमध्ये क्रांती निर्माण झाली. -
इन्स्टंट कॅमेरे (१९४७ नंतर)
‘पोलरॉइड’ने काही मिनिटांत विकसित होणारी प्रतिमा दिली. मग कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणात हे कॅमेरे सांस्कृतिक आयकॉन बनले. -
डिजिटल कॅमेरे आणि स्मार्टफोन (१९९० – सध्याचे जग)
डिजिटल कॅमेऱ्यांनी फोटोग्राफीला चित्रपटापासून मुक्त केले. आज स्मार्टफोनमधील विविध प्रकारच्या लेन्स आणि एआय क्षमता यांमुळे आता प्रत्येकाला व्यावसायिक स्तरावरची फोटोग्राफी गवसली आहे.

CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल