-
वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाची स्वतःची खासियत सांगितली आहे. त्यात शुक्र हा ऐश्वर्य, वैभव आणि संपत्ती देणारा ग्रह मानला जातो.
-
दर महिन्याला शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सप्टेंबर महिन्यात शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. स्वराशीत शुक्र प्रवेश करताच मालव्य राजयोग निर्माण होईल.
-
तर सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगही तयार होणार आहे. हे दोन योग एकत्र येणे म्हणजे काही राशींसाठी अक्षरशः सुवर्णसंधी.
-
या ग्रहयोगामुळे ३ राशींच्या जीवनात पैशांचा आणि यशाचा पाऊस पडणार आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
मालव्य आणि बुधादित्य राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. या काळात तुमचे भाग्य तुमच्या सोबत असेल. तुमची रखडलेली कामे लवकर पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला पैसे मिळवण्याची संधी मिळू शकेल. आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल.
-
शुक्राचा एक वर्षानंतर स्वराशीत परतण्याचा फायदा कुंभ राशीला भरभरून मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते.
-
मकर राशीच्या लोकांसाठी तर जणू भाग्याचे दरवाजेच उघडणार आहेत. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. जुन्या संपर्कांच्या जोरावर करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होऊ शकेल. तुम्हाला वाहन सुख मिळू शकते. तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो.
-
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी