-
हिंदू धर्मात कापूराला खूप महत्त्व आहे. कोणतीही पूजा, आरती किंवा धार्मिक विधी कापूरशिवाय अपूर्ण मानला जातो. कापूर जाळल्याने त्याचा सुगंध घरभर पसरतो, वातावरण पवित्र होते आणि मन प्रसन्न होते. चला तर पाहूया कापूर जाळण्याचे प्रमुख फायदे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
आध्यात्मिक कारण
नकारात्मक ऊर्जा दूर होते
ज्योतिषशास्त्रानुसार प्राचीन मान्यतेनुसार, घरात कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वाईट आत्म्यांचा प्रभाव कमी होतो. त्याचा सुगंध घरात शांतता आणतो आणि वातावरण सकारात्मकतेने भरून जाते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळतो
ज्योतिषशास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मीला कापराचा सुगंध अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळे पूजेमध्ये कापूर जाळल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, घरात संपत्ती वाढते आणि लक्ष्मीदेवीची कृपा कायम राहते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
लवंगासोबतचा खास प्रयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, सात ते आठ लवंगा कापूरसोबत जाळून, त्याचा धूर घरभर पसरवल्यास आजार दूर होतात, कर्ज कमी होण्यास मदत मिळते आणि अडलेली कामे सुरू होतात. सलग ४० दिवस हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
शुभ फल आणि आरोग्य लाभ
सकाळ-संध्याकाळ प्रार्थनेनंतर कापूर आणि लवंगाची आरती केल्याने घरात आनंद आणि समृद्धी वाढते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि घरामध्ये नेहमी उत्साह टिकून राहतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
वैज्ञानिक कारण
वातावरण शुद्ध होते
कापूर जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू, विषाणू व जंतू नष्ट होतात. त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ आणि ताजेतवाने राहते आणि त्याचा थेट फायदा कुटुंबीयांच्या आरोग्याला होतो. .(छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
गाढ झोप येण्यास मदत
कापूराचा सुगंध मनाला शांत करून ताण कमी करतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते. कारण- त्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
मानसिक शांती
ध्यान किंवा योग करताना कापूर जाळल्यास मन एकाग्र होते, ताण कमी होतो व मानसिक शांतता लाभते. कामाचा थकवा किंवा दिवसाचा ताण यांमुळे जेव्हा मन अस्वस्थ होते, तेव्हा कापराचा सुगंध एक उत्तम औषध ठरतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
संसर्ग आणि रोगांपासून बचाव
हिवाळ्यात कापूर जाळणे विशेषतः उपयोगी मानले जाते. हा पदार्थ वातावरण शुद्ध करून संसर्गजन्य रोगांचा धोका कमी करतो आणि एक प्रकारे नैसर्गिक औषधासारखे कार्य करतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
घर सुगंधित आणि प्रसन्न राहते
कापूर बारीक करून, त्यात लव्हेंडर तेल मिसळून, घरात फवारल्यास वातावरण अत्यंत सुगंधित होते. तसेच कापूर पाण्यात मिसळून, फरशी स्वच्छ केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. (छायाचित्र स्रोत: फ्रीपिक)

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा