-
थकलेला; पण स्टायलिश!
‘टायर्ड गर्ल मेकअप’ हा लूक सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय होत आहे. नावाने जरी तो थकवा दाखवतोय असं वाटलं तरी हा लूक आहे अगदी सहज सुंदरतेचा उत्सव. -
परफेक्शन विसरा; नैसर्गिकतेला कवटाळा
हा ट्रेंड मेकअपमधल्या अपूर्णतेला स्टाईलमध्ये बदलतो. डोळ्यांखाली थोडा शॅडो, हलके ब्लश, साधा लूक—सगळं जसं आहे तसं! -
हलका बेस; मोठा इम्पॅक्ट
जड फाउंडेशनची गरज नाही. टिंटेड मॉइश्चरायझर, हलकासा कव्हर—त्वचेचा नैसर्गिक पोतच खरी ओळख ठरतो. -
डोळ्यांचा ‘अर्धवट’ ग्लॅम
या लूकमध्ये परफेक्ट विंग आयलायनर नकोच. त्याऐवजी थोडा स्मज्ड लाइनर आणि मऊ शॅडोज एक नैसर्गिक आकर्षण निर्माण करतात. -
लाली म्हणजे सौंदर्याचा स्पर्श
क्रीम ब्लशच्या हलक्या स्ट्रोक्समुळे चेहऱ्यावर येतो नुकताच चालून आल्यासारखा आरोग्यदायी लालसरपणा, ज्यात साधेपणाचं सौंदर्य चमकून दिसतं. -
बोल्ड नाही; मऊ ओठ
लिप बाम किंवा ग्लॉसने सजलेले हायड्रेटेड व मऊ ओठ हा लूक अधिक रिलेटेबल बनवतात. निखळ नैसर्गिकता हाच त्याचा गाभा. -
हा ट्रेंड का आवडतोय?
कारण- हा ट्रेंड सांगतो सौंदर्य म्हणजे वास्तवातलं स्वतःला स्वीकारणं. जड मेकअपशिवायही आपण आकर्षक दिसू शकतो, हेच याचं गुपित!

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक