आगामी सार्वत्रिक निवडणूक अडीच वर्षांवर येऊन ठेपलेली असताना देशभरातील पक्ष आणि त्यांच्याशी निगडित संस्था निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन आखताना दिसत आहेत. भाजपाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्थादेखील (आरएसएस) सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. आरएसएसने तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच तेथील प्रमुख माध्यमांच्या संपादकांशी बंद दाराआड बैठक घेतली आहे. माध्यमांच्या संपादकांशी बैठक घेण्याची आरएसएच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> …तर ‘महागठबंधन’सारख्या प्रयोगाला देशपातळीवर पाठिंबा देऊ- अखिलेश यादव

‘द न्यूज मिनिट’ या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आरएसएसने १६ ऑगस्ट रोजी तामिळनाडूमधील सर्व प्रमुख माध्यमांच्या संपादकांसोबत बंद दाराआड बैठक घेतली आहे. या बैठकीत आरएसएसचे कार्य, त्यांची काम करण्याची पद्धत तसेच अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पाडली आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी मोजक्याच माध्यमांच्या संपादकांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच ही पूर्णपणे ‘ऑफ द रेकॉर्ड’ बैठक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले होते.

हेही वाचा >>> Bilkis Bano case: “दोषींची सुटका रद्द करा, हे फार लाजिरवाणं”, तब्बल सहा हजारजणांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

तामिळनाडीमध्ये विस्तार व्हावा यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. या बैठकीत आरएसएस संस्थेविषयी संपादकांना सांगण्यात आले. तसेच आगामी काळात आम्हाला तामिळनाडूमध्ये काय काय करायचे आहे, याबद्दलची माहिती आरएसएसने या बैठकीत माध्यमांच्या संपादकांना दिली आहे. आरएसएसच्या या बैठकीबद्दल बोलताना “इतिहासात पहिल्यांदाच आरएसएसने मीडियापर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे,” असे बैठकीला उपस्थित असलेल्या एका संपादकाने सांगितले.

हेही वाचा >>> तृणमूल काँग्रेसच्या ‘कातडी सोलू’ला भाजपाचे ‘जोड्याने मारू’ने उत्तर; पश्चिम बंगालमधील राजकारण तापले

तसेच आरएसएसने घेतलेली बैठक आणि त्यांचा अजेंडा याबाबत बैठकीला उपस्थित असलेल्या आणखी एका संपादकाने सविस्तर माहिती दिली आहे. “२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांअगोदर माध्यमांपर्यंत पोहोचण्याचा आरएसएसचा प्रयत्न आहे. विशेषत: तामिळनाडूमध्ये तसा त्यांचा प्रयत्न आहे. तामिळनाडूमधील जनतेचे मन जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे होसबाळे यांनी आम्हाला सांगितले आहे,” अशी माहिती या संपादकाने दिली आहे.

हेही वाचा >>> दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

दरम्यान, मागील दहा वर्षांपासून तामिळनाडूमध्ये आरएसएसच्या १० हजार शाखा होत्या. आता या शाखा वाढल्या आहेत. हा आकडा आता १५०० ते २०० पर्यंत पोहोचला आहे, असा दावा आरएसएसने केला आहे. तसेच सातत्याने मेहनत घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे. तामिळनाडूमध्ये दररोज किमान १५०० शाखा भरतात. दर आठवड्याला किमान ६०० शाखांवर बैठक घेतली जाते. तसेच यातील ४०० शाखांवर महिन्यातून एकदा बैठक घेतली जाते, अशी माहिती आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu rss sarkaryavah dattatreya hosabale meeting with media editors prd
First published on: 19-08-2022 at 14:50 IST