लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक तरुण घराजवळ राहणाऱ्या मुलीस शिकवणीला जात असताना त्रास देत असल्याने तसेच त्याने घरात शिरुन त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षांच्या मुलीने राहते घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

त्रिशला बंडु कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आराेपी साेमनाथ ऊर्फ काेल्ह्या संजय राखपसरे (वय २२, रा. लाेहगाव) याच्यावर विमानतळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा… शिक्षक भरतीबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाची अपटेड… शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय!

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साेमनाथ राखपसरे आणि पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. तक्रारदार यांची १५ वर्षांची मुलगी ही मागील आठ दिवसांपूर्वी शिकवणीला जाताना आराेपीने तिच्याजवळ येऊन रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘मी साेडताे’ असे म्हणत रिक्षामध्ये बसण्याची तिच्यावर जबरदस्ती केली. ११ सप्टेंबर राेजी आरोपीने मुलीच्या घरात साेफ्यावर बसून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न करत असताना ती पलीकडे सरकली. त्याचवेळी मुलीची आई घरामध्ये आली असता तिला धक्का देऊन तो पळून गेला होता. मुलीने राहते घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस. लहाने पुढील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 15 year old girl committed suicide due to molestation from a rickshaw driver in pune print news vvk 10 dvr